राज्यात 20 जुलैनंतर पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता; अनेक जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

0

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिकांबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आता दिलासादायक बातमी समोर आली असून, राज्यातील हवामानात बदल होत असून पुढील काही दिवसांत पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. सध्या राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून 20 जुलैपासून अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. आज सोलापूर, धाराशिव तसेच कोकणातील काही भागांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा असून शेतकरीही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेश परिसरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून समुद्रसपाटीपासून सुमारे 900 मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच अफगाणिस्तानच्या दिशेने येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे काही दिवस मॉन्सूनच्या हालचालींना अडथळा निर्माण झाला होता. मात्र हा प्रभाव दोन ते तीन दिवसांत कमी होण्याची शक्यता असल्याने मॉन्सून पुन्हा सक्रिय होईल, असा अंदाज आहे.

20 जुलैनंतर नाशिक, पुणे, अहिल्यानगर, रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, मुंबई, सांगली, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर आणि बीड जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

दरम्यान, काल मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात झालेल्या पावसामुळे वातावरणातील उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. जून महिन्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्यानंतर जुलैच्या सुरुवातीला झालेल्या दमदार पावसाने ती तूट मोठ्या प्रमाणात भरून निघाली होती. गेल्या काही दिवसांपासून उत्तर कोकणात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आता पुन्हा मॉन्सून सक्रिय होत असल्याने राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आ

Leave A Reply

Your email address will not be published.