भाऊबीजेच्या प्रवाशांसाठी रेल्वेचा दिलासा! भुसावळ-देवळालीदरम्यान विशेष मेमू
भुसावळ : दिवाळी आणि भाऊबीज सणानिमित्त रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने प्रवाशांसाठी विशेष मेमू रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. भुसावळ ते देवळालीदरम्यान १० आणि ११ नोव्हेंबर रोजी १२ डब्यांची अनारक्षित विशेष मेमू धावणार असून, या कालावधीत एकूण चार फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०१२२६ भुसावळ-देवळाली विशेष मेमू सकाळी ९.१५ वाजता भुसावळ येथून रवाना होईल. ही गाडी दुपारी १.०५ वाजता देवळाली येथे पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०१२२५ देवळाली-भुसावळ विशेष मेमू दुपारी १.३० वाजता देवळाली येथून सुटून सायंकाळी ५ वाजता भुसावळला पोहोचेल.


या विशेष मेमूला जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, लासलगाव आणि नाशिक रोड या प्रमुख स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना सणासुदीच्या काळात प्रवासासाठी अतिरिक्त रेल्वेसेवा उपलब्ध होणार आहे.
दिवाळी आणि भाऊबीजेनिमित्त गावी जाणाऱ्या तसेच नातेवाइकांकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढते. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामु