नशिराबाद पोलिसांची धडक कारवाई ; गावठी कट्ट्यासह सराईत आरोपी अटकेत

0

नशिराबाद । बसस्टॅण्ड परिसरात गावठी कट्टा घेऊन दहशत माजवत फिरणाऱ्या सराईत आरोपीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना गुप्त माहिती मिळाली की सराईत आरोपी कमलाकर प्रभाकर महाजन (वय-36, रा. वरची अळी, नशिराबाद) हा बसस्टॅण्ड परिसरात कट्टा घेऊन फिरत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी तात्काळ पोलीस पथकाला कारवाईचे आदेश दिले.

पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकून रविवारी सायंकाळी सुमारे 7.30 वाजता आरोपीला जागीच पकडले. त्याच्या ताब्यातून लोखंडी, चंदेरी रंगाचा व काळ्या प्लास्टिकच्या मुठीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध नशिराबाद पोलीस स्टेशन येथे गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र ठाकरे करीत आहेत.

सदर कारवाई महेश्वर रेड्डी, संदीप गावित तसेच केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या पथकातील अधिकाऱ्यांनी यशस्वीरीत्या केली.

Leave A Reply

Your email address will not be published.