ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; चित्रपटसृष्टीवर शोककळा
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले आहे. गोव्यामध्ये ह्दयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

नाना पाटेकर यांना गोव्यातील डोना पावला येथील घरी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने उपचारासाठी त्यांना तातडीने मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे डॉक्टरांनी त्यांना ४५ मिनिटे सीपीआर देऊन त्यांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.


नानांच्या अभिनयाची जडणघडण रंगभूमीवर
नाना पाटेकर यांनी मराठीसह अनेक बॉलिवूड चित्रपटामध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. नाना पाटेकर यांची अभिनयाची जडणघडण रंगभूमीवर झाली. सुरुवातीच्या काळात त्यांनी मराठी नाटकांमध्ये काम केलं. त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करत 1978 मध्ये आलेल्या ‘गमन’ या चित्रपटातून त्यांच्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात झाली.
मात्र 1989 मधील ‘परिंदा’ हा त्यांच्या कारकिर्दीतील मोठा टर्निंग पॉइंट ठरला. या चित्रपटातील अण्णा या व्यक्तिरेखेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यांच्या वेगळ्या शैलीचे अनेकांकडून कौतुक करण्यात आले.
क्रांतिवीर, तिरंगा, अब तक ५६, वेलकम अशा हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या भूमिका गाजल्या होत्या. तसेच मराठीमध्येही डॉ. प्रकाश बाबा आमटे, नटसम्राट, देऊळ या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका लक्षवेधी ठरली. नानांचा मराठीत ‘नटसम्राट’ हा सिनेमा विशेष गाजला. रुपेरी पडद्यावर ‘नटसम्राट’ मोठं करणारे नाना पाटेकरच अनेकांच्या डोळ्यासमोर उभे राहतात.
नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सामाजिक कार्य
नाना पाटेकर यांनी अभिनयासोबत सामाजिक क्षेत्रामध्येही आपल्या कार्याची छाप पाडली होती. त्यांनी नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सामाजिक कार्य सुरू केले होते. सिनेसृष्टीसह राजकीय नेतेमंडळींसोबतही त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. मात्र त्यांच्या अचानक जाण्याने सिनेसृष्टीसह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावरही शोककळा पसरली आहे.