जळगावात १५ हजारांची लाच घेताना सहायक अभियंत्यासह तीन जण जाळ्यात

0

जळगाव : विद्युत मीटर तपासणीनंतर वीज उपकरणाचा भार अधिक असल्याने वीज चोरीची कारवाई टाळण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेताना महावितरणचे सहायक अभियंता विशाल वसंत नेमाडे (३७, रा. योगेश्वर नगर) यांच्यासह दोन वरिष्ठ तंत्रज्ञांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई शनिवारी (१४ नोव्हेंबर) करण्यात आली.

एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरात तक्रारदाराच्या घरी महावितरणच्या महसूल व देय उपविभागाचे सहायक अभियंता विशाल नेमाडे, वरिष्ठ तंत्रज्ञ भरत कडू तायडे (४५, रा. कोल्हे हिल्स परिसर), रवींद्र छन्नू पाटील (४१, रा. पंडित कॉर्नर अपार्टमेंट) हे वीज मीटर तपासणीसाठी गेले होते. तेथे बसविलेल्या नवीन वीज मीटरची तपासणी करून वीज मीटरचे व घरातील उपकरणाचे फोटो काढले.

त्यानंतर भरत तायडे याने तक्रारदारास फोन करून बोलविले व तुमच्याकडे अधिक भार असल्याने वीज चोरीची कारवाई टाळण्यासाठी सहायक अभियंत्याच्या नावाने ४० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती १५ हजार रुपयांची लाच घेण्यास संमती दर्शविली.

Leave A Reply

Your email address will not be published.