भुसावळमार्गे दिवाळीसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस-हटिया विशेष गाड्या धावणार

0

भुसावळ । आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी लोटिट-हटिया-लोटिट दरम्यान साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याची घोषणा मध्य रेल्वेने केली आहे. या विशेष गाड्यांच्या एकूण ६ फेऱ्या होणार असून, भुसावळसह २३ विविध महत्त्वाच्या स्थानकांवर त्यांना अधिकृत थांबे दिले आहेत.

गाडीक्रमांक ०८६१० लोटिट-हटिया विशेष ही १३ ते २७ऑक्टोबरदरम्यान दर मंगळवारी रात्री १०.५५ वाजता लोटिट येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे ४.३० वाजता हटिया येथे पोहोचेल. या गाडीच्या एकूण तीन फेऱ्या होतील. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०८६०९ हटिया-लोटिट विशेष ही १२ ते २६ ऑक्टोबरदरम्यान दर सोमवारी दुपारी ४.२० वाजता हटिया येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ९.५० वाजता लोटिट येथे पोहोचेल. या गाडीच्याही तीन फेऱ्या निश्चित केल्या आहेत. यामुळे वाढत्या गर्दीत दिलासा मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.