अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केली पर्यावरण जनजागृतीपर नाटिका

0

जळगाव । गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये मूल्यशिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जाणीव रुजविण्याच्या उद्देशाने गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव यांच्या वतीने आयोजित ‘गांधीतीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय स्पर्धा’ घेण्यात येते. या स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पर्यावरण जनजागृतीपर अत्यंत प्रभावी नाटिका सादर केली.

स्कूलच्या इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या नाटिकेत नदी स्वच्छता, जलप्रदूषण रोखणे, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, प्राणिमात्रांप्रती दया आणि पर्यावरण संरक्षण यांसारखे विषय प्रभावीपणे मांडले होते. विद्यार्थ्यांच्या सहज व प्रभावी अभिनयातून निसर्गाचे संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश उपस्थितांपर्यंत पोहोचविण्यात यश आले. नाटिकेची संकल्पना व निर्मिती इयत्ता आठवीच्या वर्गशिक्षिका सौ. सुकीर्ती बारेवार यांची होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अभिनय सादर करून उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळविली.

या उपक्रमासाठी अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन यांच्या मार्दर्शनात विद्यालयाच्या प्राचार्या सौ. रश्मी लाहोटी तसेच गांधीतीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय स्पर्धेचे समन्वयक राजेंद्र बावस्कर यांचे सौजन्य व प्रोत्साहन लाभले. पर्यावरण संवर्धन हा केवळ अभ्यासक्रमाचा विषय नसून जीवनाचा संस्कार आहे, हा संदेश या उपक्रमातून प्रभावी असा दिला गेला.

Leave A Reply

Your email address will not be published.