Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
मुंबई । राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ही घोषणा केली.दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समितीसाठी राज्यात निवडणूक होईल.
कोणत्या १२ जिल्हापरिषदांसाठी निवडणूक होणार?
कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव व लातूर या 12 जिल्हा परिषदांचा समावेश आहे.
महत्वाच्या तारखा –
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक
जिल्हाधिकारी प्रसिद्धी – 16 जानेवारी
अर्ज स्वीकारणे – 16 ते 21 जानेवारी
छाननी – 22 जानेवारी
उमेदवारी माघारीची अंतिम मुदत – 27 जानेवारी (दुपारी 3 )
अंतिम उमेदवारी यादी आणि चिन्हे वाटप – 27 जानेवारी (दुपारी साडे तीन नंतर)
जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदान – 5 फेब्रुवारी (साडे सात ते साडे पाच)
मतमोजणी – 7 फेब्रुवारी (सकाळी दहा पासून)