सुनीता बानाजी देसाई यांचे निधन
आपल्या छत्रपती शाहू निवृत्त पोलीस कल्याणकारी असोसिएशन कोल्हापूर जिल्हा संघटनेचे सन्मानीय सदस्य बानाजी कृष्णाजी देसाई निवृत्त पोलीस उप निरीक्षक रा.जय भवानी कॉलनी (दिवंगत पी. एन. पाटील यांच्या बंगाल्याच्या जवळील “शाहू चौकाच्या पुढे महालक्ष्मी पार्क) फुलवाडी रिंगरोड कोल्हापूर यांच्या सुविध्य पत्नी सौभाग्यवती सुनीता बानाजी देसाई यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्या प्रदीप बाणाजीराव देसाई आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी वर्ग १, यांच्या त्या मातोश्री होत. देसाई परिवारावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे,पण ईश्वराच्या इच्छेच्या पुढे आपण हतबल आहोत.ईश्वर त्यांच्या आत्म्यास सदगति देवो.त्यांना आपल्या संघटनेच्या सर्वच पदाधिकारी,सभासद बंधु,भगिनींच्या वतिने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहोत.

