“राज्यातील बँकांचे व्यवहार मराठीत झाले पाहिजे, यासाठी…”; राज ठाकरेंच्या भेटीनंतर उदय सामंतांची प्रतिक्रिया

0

शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ येथे भेट घेतली. राज ठाकरेंच्या भेटीनंतर उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि या भेटीचे कारण स्पष्ट केले आहे. या भेटीत राज ठाकरेंनी मराठीच्या आग्रहाबाबत काही सूचना केल्या असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

उदय सामंत यांनी म्हटले की, ‘आज मराठीच्या संदर्भात ज्या घडामोडी चालू आहेत. त्यांसंदर्भात राज ठाकरेंनी मला भेटायला बोलवलं होतं. येथे मी एकनाथ शिंदेंची परवानगी घेऊन आलो होतो. मी राज ठाकरेंना दुसऱ्यांदा भेटत आहे. महाराष्ट्रात ज्या काही संस्था, बँका आहेत त्यात मराठीच्या बाबतीत निर्णय घेतला जातो किंवा तिथे ज्या काही गोष्टी घडतात. त्याचा प्रतिबंध कसा करायचा. त्या संदर्भात राज ठाकरेंनी काही सूचना केल्या आहेत. त्यासंदर्भात त्या मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून त्यात काय सुधारणा करता येतील याचे प्रयत्न करू’, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

“महाराष्ट्रात अनेक भाषा बोलल्या जातात. अनेक राज्यातील लोक महाराष्ट्रात आले आहेत. अनेक ठिकाणी मराठी भाषिकांवर अन्याय केला जातो दादागिरी केली जाते. त्यावर काहीतरी कायदेशीर वलय असलं पाहिजे, असं मत राज ठाकरेंचे आहे. राज्यातील बँकांचे व्यवहार मराठीत झाले पाहिजे यासाठी सर्व समित्याची बैठक घेईन आणि काय कारवाई करता येतील याबाबत निर्णय घेऊ,” असंही सामंत यांनी म्हटलं आहे

Leave A Reply

Your email address will not be published.