इगतपुरीतील ५७५ विद्यार्थ्यांसह शिक्षकांना ऐतिहासिक चित्रपट छाव्याचे दर्शन

0

शिवसेनेचे युवानेते संजय खातळे यांचा उपक्रम.

इगतपुरी : स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनाचे औचित्य साधत शिवसेनेचे युवानेते यांनी इगतपुरीतील ५७५ विद्यार्थ्यांसह शिक्षकांना स्वखर्चाने नाशिकच्या सिटी सेंटर मॉल येथील चित्रपट गृहात ऐतिहासिक छावा चित्रपट दाखवला. शंभुराजेंचा जाज्वल इतिहास पडद्यावर बघतांना विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोष केला. छत्रपती संभाजी राजे यांची शौर्य गाथा सर्वांना माहीत व्हावी तसेच मराठ्यांचा जाज्वल इतिहास सर्वांना माहीत व्हावा या उद्दात्त हेतुने शिवसेनेचे युवानेते तथा सामाजिक कायकर्ते संजय खातळे यांनी इगतपुरी शहरातील महात्मा गांधी हायस्कुल व नुतन मराठी शाळेच्या जवळपास ५७५ विद्यार्थी व विद्यार्थींनी यांना छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा छावा हा ऐतिहासिक चित्रपट दाखवण्याचे ठरविले. यासाठी युवानेते संजय खातळे यांनी दि. ११ रोजी विद्यार्थ्यांना नाशिक येथे जाण्यासाठी महामंडळाच्या ७ बसची बुकींग करून विद्यार्थ्यांना स्वखर्चाने नाशिक येथे घेऊन गेले होते. संजय खातळे यांनी स्वखर्चातुन मंगळवार दिनांक ११ रोजी नाशिक येथील सिटी सेंटर मॉल येथील सिनेमागृहाचे पुर्ण बुकिंग केले होते.

या चित्रपटातील छत्रपती संभाजी राजे यांच्या जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना अंगावर शहारे आणणारे थरारक प्रसंग तर काही प्रसंगात पाणवलेल्या डोळ्यांच्या कडा याची अनुभती यावेळी छावा चित्रपट पहातांना विद्यार्थ्यांनी अनुभवली. अविस्मरणीय अशा छावा या ऐतिहासिक चित्रपटाचा विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षिका या सर्वांनी अनुभव घेतला. विशेष म्हणजे चित्रपटाच्या मध्यातंरावेळी लाच लुचपत विभागाच्या पोलीस अधिक्षिका शर्मिष्ठा वालावलकर यांनी भेट देऊन विद्यार्थांना मार्गदर्शन केले. तसेच परिक्षा संपल्यावर सुट्टीच्या काळात विद्यार्थ्यांनी शिवचरीत्राचे वाचन करावे व सर्वोकृष्ट वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात येईल अशी माहिती शर्मिष्ठा वालावलकर यांनी दिली.

या प्रसंगी लाचलुचपत विभागाच्या अधिकारी शर्मिष्ठा वालावलकर, महिला पोलीस निरीक्षक मिरा आदमाने, राजेंद्र सानप, संदीप हांडगे, शिवसेनेचे युवानेते संजय खातळे, माजी नगराध्यक्ष सतिष करपे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके, मंगेश शिरोळे, विनायक पाटील, सचिन खातळे, योगेश राऊत, अमोल बोरावके, महेश शिरोळे, किरण फलटणकर, मयुर कपाटे धनंजय पोरजे, पांडुरंग यादव, महादेव यादव आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.