जळगावात पुन्हा भीषण अपघात; आयशरच्या धडकेत तरुण ठार

0

जळगाव । जळगाव शहरात गेल्या १२ तासात दोन भीषण वाहतूक अपघात झाला असून यात एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे. बुधवारी रात्री अजिंठा चौकात एक भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना घडली होती, त्यानंतर आज गुरुवारी सकाळी कृषी समितीजवळ एका पायी जाणाऱ्या तरुणाला भरधाव आयशरने उडवले.

अजय सिताराम कोळी वय २६ रा. पिंपळे खुर्द ता. धरणगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील अजिंठा चौकात बुधवारी १८ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजेच्य सुमारास एका भरदार ट्रकने चिरल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असताना गुरुवारी १९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास भुसावळकडून जळगावकडे जाणारा एका भरधाव आयशरने पायी जाणाऱ्या अजय कोळी याला जोरदार धडक दिल्याने जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. दरम्यान मयताच्या खिशातील कागदपत्रामुळे त्यांची ओळख पटली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Leave A Reply

Your email address will not be published.