मुथूट एक्झिमने नागपूर येथे आपल्या नव्या गोल्ड पॉइंट सेंटरचा शुभारंभ करून आपले अस्तित्व विस्तारित केले
नागपूर । 137 वर्ष जुन्या व्यवसाय समूह मुथूट पप्पाचन ग्रुपची (मुथूट ब्लू म्हणूनही ओळखली जाणारी) मौल्यवान धातूची शाखा म्हणजेच मुथूट एक्झिम प्रायव्हेट लिमिटेडला नागपुरात आपल्या नवीन गोल्ड पॉइंट सेंटरच्या भव्य उद्घाटनाची घोषणा करताना अभिमान होत आहे. नवीन मुथूट गोल्ड पॉइंट सेंटर हे दुकान क्र. इतवारी येथील लाजवंती कॉम्प्लेक्समध्ये असून चितरोली स्क्वेअर मेट्रो स्टेशनजवळ, नागपूर, महाराष्ट्र (पिन कोड ४४० ००२), हे कंपनीचे भारतातील २९ वे आणि महाराष्ट्रातील चौथे केंद्र आहे.
सध्याच्या स्थितीला नागपूर हे लक्षणीयरित्या विकसित झालेले शहर आहे आणि आता महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख शहर म्हणून ओळखले जात आहे. नागपुरातील हे गोल्ड पॉइंट सेंटर केवळ व्यावसायिक विकासच नाही तर शहराच्या वाढत्या संपत्तीतही/ अर्थव्यवस्थेतही त्याचा मोठा वाटा असणार आहे. नवीन केंद्राचे ध्येय स्थानिकांना आपले सोने खरेदी विक्रीसाठी एक विश्वासार्ह आणि खुली बाजारपेठ उपलब्ध करून देणे आहे आणि समुदायाची अर्थव्यवस्था वाढीला हातभार लावणे आहे.
मुथूट एक्झिमचे गोल्ड पॉइंट सेंटर पारदर्शकता, ग्राहकांचा विश्वास जपण्यासाठी, बांधिलकी आणि त्यांच्या वचनबद्धतेसाठी प्रसिद्ध आहेत. या केंद्रांवर, ग्राहक त्यांच्या जुन्या आणि वापरलेल्या सोन्याच्या वस्तू वाजवी आणि अचूक मूल्यमापनाच्या आश्वासनासह विकू शकतात. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडली जाते, ज्यामुळे ग्राहकांना प्रत्यक्ष मूल्यांकनाचा दाखला मिळतो. IMPS, NEFT किंवा RTGS सारख्या सुविधांच्या माध्यमातून मोठ्या रकमेचे पेमेंट केले जाते तर 10,000 रुपयांपर्यंतच्या सोन्यासाठी झटपट रोख पेमेंट केले जाते, ज्यामुळे अखंडित आणि विश्वासार्ह व्यवहाराचा अनुभव मिळतो.
मुथूट एक्झिमचे सीईओ केयुर शाह यांनी स्थानिक समुदायाला सक्षम बनविण्याच्या केंद्राच्या क्षमतेवर भर दिला आहे. नागपुरात आमची नवीन शाखा सुरू करून आम्ही स्थानिक समुदायांना सेवा देण्याच्या आमच्या प्रयत्नात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. हे केंद्र भारतातील सोन्याच्या पुनर्वापरासाठी सोन्याचे सुरक्षित व्यासपीठ ठरेल आणि त्यामुळे आयातीवरील निर्भरता कमी करून आर्थिक वाढीचा स्रोत निर्माण होईल.”
मुथूट पप्पाचन ग्रुपचे कार्यकारी संचालक आणि मुथूट एक्झिमचे व्यवस्थापकीय संचालक थॉमस मुथूट उद्घाटनाबाबत बोलताना म्हणाले की “नागपूरमध्ये आमचा विस्तार देशभरातील आमच्या ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी आमचे समर्पण प्रतिबिंबित करतो. ही नवीन शाखा केवळ सोन्याच्या पुनर्वापरासच नाही तर आर्थिक स्थिरता आणि गुंतवणुकीला देखील प्रोत्साहन देते, ज्यामुळे समाजाला मोठ्या प्रमाणावर फायदा होतो.”
मुथूट एक्झिम प्रा. लि. (MEPL) मौल्यवान धातूंच्या बाजारपेठेत नाविन्यपूर्णता आणण्यात आघाडीवर आहे. भारतात सुवर्ण पुनर्वापर केंद्र सुरू करणारा पहिला संघटित स्पर्धक म्हणून MEPL ने उद्योगात सातत्याने उद्दिष्ट सेट केले आहेत. 2015 मध्ये कोईम्बतूर येथे आपले पहिले गोल्ड पॉइंट सेंटर सुरू केल्यापासून कंपनीने मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता आणि आता नागपूरसह प्रमुख शहरांमध्ये विस्तार केला आहे, सातत्याने उच्च दर्जाची उत्पादने परवडणाऱ्या किमतीत देत आहेत.
गोल्ड पॉइंट केंद्रांबद्दल थोडक्यात –
गोल्ड पॉइंट सेंटर्समध्ये, मुथूट एक्झिम जुन्या आणि वापरलेल्या सोन्याच्या वस्तू थेट ग्राहकांकडून खरेदी करतात. या वस्तू नंतर पुन्हा प्रक्रिया केल्या जातात, परिष्कृत केल्या जातात आणि घरगुती वापरासाठी पुन्हा सादर केल्या जातात. प्रक्रिया पूर्णत: पारदर्शक आणि निरीक्षण करण्यायोग्य असल्याने ग्राहक वाजवी आणि अचूक मूल्यमापनाची अपेक्षा करू शकतात. IMPS, NEFT किंवा RTGS द्वारे जास्त रकमेसह पेमेंट केले जाते तर 10,000 रुपयांपर्यंतच्या सोन्यासाठी त्वरित रोख पेमेंट केले जाते.
मुथूट एक्झिम प्रा. लिमिटेड (MEPL) बद्दल थोडक्यात –
मुथूट एक्झिम प्रा. लि. ही मुथूट पप्पाचन समूहाची मौल्यवान धातू बनविणारी शाखा आहे. मौल्यवान धातूंच्या बाजारपेठेत नाविन्यपूर्ण उत्पादने आणण्यासाठी आणि उत्तम सेवा प्रदान करण्यासाठी प्रसिद्ध अशी MEPL ही भारतात सुवर्ण पुनर्वापर केंद्र सुरू करणारी पहिली संघटित कंपनी होती. 2015 मध्ये कोईम्बतूरमध्ये MEPL ची स्थापना झाल्यापासून उच्च-गुणवत्तेची आणि परवडणारी उत्पादने प्रदान करत देशभरातील प्रमुख शहरांमध्ये विस्तारले आहे.
मुथूट पप्पाचन ग्रुप बद्दल थोडक्यात –
1887 मध्ये स्थापन झालेला, मुथूट पप्पाचन ग्रुप (MPG) ही भारतीय व्यवसायातील अनन्यसाधारण वैशिष्ट्य असलेली देशव्यापी अस्तित्व असलेली आणि ग्राहकांसाठी उच्च प्रतीची तयार केलेली उत्पादने व सेवा असलेली एक महत्त्वपूर्ण संस्था आहे. ज्या समूहाने किरकोळ व्यापारात आपली मुळे रोवली, नंतर वित्तीय सेवा, आदरातिथ्य, ऑटोमोटिव्ह, रियल्टी, आयटी सेवा, आरोग्यसेवा, मौल्यवान धातू आणि पर्यायी ऊर्जा यासह विविध क्षेत्रांमध्ये विविधता आणली. मुथूट फिनकॉर्प लिमिटेड ही तिची प्रमुख कंपनी असून मुथूट पप्पाचन ग्रुप (MPG) आज भारतात प्रभावशाली स्थितीत उभा आहे. ज्यामध्ये 40,000 हून अधिक कर्मचारी, देशभरात 5,200 पेक्षा जास्त शाखांचे विशाल नेटवर्क आणि बॉलीवूड स्टार शाहरुख खान, विद्या बालन सारखे कलाकार त्याचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून आहेत. मुथूट पप्पाचन फाऊंडेशन समूहाची CSR शाखा आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि उपजीविका (HEEL) वर लक्ष केंद्रित करणाऱ्या संपूर्ण समूह कंपन्यांसाठी CSR उपक्रम राबविण्याची सुविधा प्रदान करते.