मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा
मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा २९ सप्टेंबर २०२४ रोजी पोईसर जिमखाना, कांदिवली पश्चिम येथे सकाळच्या सत्रात पार पडली. या सभेमध्ये मुंबई उपनगरच्या १०० पेक्षा जास्त सभासदांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
या सभेत मल्लखांब खेळाच्या व संघटनेच्या प्रगतीसाठी विविध महत्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. सर्व सदस्यांनी मल्लखांब खेळाला महत्व वाढवण्याचे विषय वर गहन विचारविनिमय केला आणि योग्य निर्णय घेतले.
विशेष म्हणजे, सध्याचे मल्लखांब खेळातील द्रोणाचार्य पुरस्कार विजेते श्री. गणेश देवरुखकर यांचा उपनगरच्या माध्यमातून गौरव करण्यात आला. याशिवाय, २री विश्व मल्लखांब स्पर्धेतील विजयी खेळाडू जान्हवी जाधव व अक्षय तरळ, तसेच उपविजेती रुपाली गंगावणे यांनाही मानाचा मुंजा देण्यात आला.
यावर्षीपासून, उपनगर संघटनेने कै. दत्ताराम दुदम (शिव छत्रपती पुरस्कार विजेते) यांच्या स्मरणार्थ १४ वर्षांच्या वयोगटातील एक मुलगा विराज आमरे व एक मुलगी तन्वी दवणे यांना उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार प्रदान करण्याची अनोखी सुरुवात केली. या पुरस्कारासोबत रोख ५,००० रुपये शिष्यवृत्ती ही देण्यात आले.
सर्व पारितोषिक वितरण श्रीमती प्रतिभाताई गिरकर (मा.नगरसेविका) यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच, अध्यक्ष करुणाकर शेट्टी, सचिव आशिष देवल, कार्याध्यक्ष गणेश देवरुखकर, मा. कार्याध्यक्ष महेंद्र चेंबूरकर व सर्व कार्यकारीणी सदस्यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
या सर्व कार्यप्रदर्शनामुळे मल्लखांब खेळाच्या विकासाला नवी गती मिळेल याची आशा आहे.