गरजवंतांना मोफत वैद्यकीय सुविधा मदत कक्षाचे आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

0

चिपळूण (ओंकार रेळेकर) चिपळूण तालुक्यात गेली अनेक वर्ष गरजू आणि गरजवंत रुग्णांच्या मदतीला तात्काळ धावून जाणाऱ्या मावळा प्रतिष्ठान च्या मोफत वैद्यकीय सुविधा मदत कक्षाचे आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते प्रितम वंजारे यांचे कार्यालय मावळा प्रतिष्ठान चिवेली फाटा उमरोली येथे नुकतेच उद्घाटन संपन्न झाले यावेळी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मावळा प्रतिष्ठान करत असलेल्या कामांचे आमदार जाधव यांनी आपल्या भाषणात विशेष कौतुक करून या प्रतिष्ठानचे प्रमुख प्रीतम वंजारी यांना शुभेच्छा देऊन आपण प्रतिष्ठानच्या सोबत सदैव असल्याचे सांगितले.

जनसेवा हीच ईश्वरसेवा या उक्ती प्रमाणे गेल्या दहा वर्षापासून प्रितम नंदकुमार वंजारे सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न सातत्याने करत आले आहे.८०% समाजकारण २०% राजकारण या बाळासाहेबांनी दिलेल्या शिकवणीनुसार आमदार भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. शिवसेना पक्षात लहानपणापासून सक्रिय असून शाखाप्रमुख, उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख ,तालुकाप्रमुख शिवाय सातारा युवासेना जिल्हा विस्तारक या पदावर नुकतीच नियुक्ती झाली आहे. दरम्यान पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार धडाडीचा युवा मावळा दिलेली जबाबदारी वंजारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न ते करत आहे.गेली ५ वर्ष रामपूर जिल्हा परिषद गटातील गरजू आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती ठीक नाही अशा लोकांना मोफत रुग्णवाहिका देण्याची सुविधा मावळा प्रतिष्ठान देत आहे.

आणि या पुढे देखील देत राहू असे प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले. चिवेली फाटा घोणसरे येथे श्री.प्रीतम वंजारे यांच्या मावळा प्रतिष्ठानच्या कार्यालयामधे मंगळवार दिनांक ९ सप्टेंबर रोजी पंचक्रोशीतील तालुक्यातील लोकांसाठी वैद्यकीय मदत कक्षचे फलकाचे अनावरण माजी मंत्री आमदार श्री.भास्कर जाधव साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या वेळी आमदार जाधव यांनी त्याचा कामाचे कौतुक केले आहे, गरीब कुटुंबातील कोणालाही वैद्यकीय मदत लागल्यास आपल्या जवळच्या युवासेना पदाधिकारी किंवा मावळा प्रतिष्ठाणच्या आपल्या सहकाऱ्याला सांगा आपण मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे वंजारी यांनी यावेळी स्पष्ट केले.

मावळा प्रतिष्ठान मार्फत एक स्तुत्य उपक्रम श्री. प्रितम वंजारे राबवत आहेत असे अनेक मान्यवरांनी आपल्या मनोकातून व्यक्त केले .उपस्थित मान्यवर शिवसेना विभाग प्रमुख संदीप घाग, सतीश काका चव्हाण , माजी विभाग प्रमुख प्रमोद जी निवाळकर , प्रथमेश भोबस्कर, संतोष हळदणकर,उपजिल्हाधिकारी युवती निशाताई भोबस्कर आयरे , विभाग अधिकारी श्रिया खेडेकर , उद्योजक तुषार शेठ लांजेकर , समाजसेवक सुभाष मोहिते , शाखाप्रमुख दादा खेडेकर , सुरेश वंजारे, सरपंच सुदेश गमरे , राजू आयरे , शुभम आयरे, मोहन जाधव , धीरज साबळे,प्रतीक कोटकर, ऋतिक कापले तेजस कपले , समीर मोरे , रवींद्र कापले , सौ सुप्रिया प्रितम वंजारे ,शुभम मोरे , सतीश जाधव, आदि मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.