आमदार चंद्रकांत पाटीलांची एकनाथ खडसेंवर जोरदार टीका; म्हणाले..

0

जळगाव । लोकसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून स्वगृही भाजपात परतण्याचे संकेत दिले होते. आता लोकसभा निवडणुका होऊन दोन महिन्यांचा काळ लोटला, तरी अजून एकनाथ खडसे यांचा भाजपा प्रवेश होऊ शकलेला नाही. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचेच काम करण्याचे संकेत दिले आहेत.

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. एकनाथ खडसे यांनी त्यांचा राजीनामा शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिला. परंतु त्यांनी अजून राजीनामा स्वीकारलेला नाही. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्याकडे राष्ट्रवादीमध्येच थांबण्याचा पर्याय आहे. पुढच्या दोन दिवसात ते भूमिका स्पष्ट करतील अशी सूत्रांची माहिती आहे. एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशाला भाजपाच केंद्रीय नेतृत्व अनुकूल असलं तरी, राज्यातील नेत्यांचा मात्र त्यांना विरोध दिसतोय. त्यामुळे एकनाथ खडसे यांचा प्रवेश रखडलेला आहे.

खडसेंवर आमदार चंद्रकांत पाटीलांची टीका
दरम्यान एकनाथ खडसे यांचे जळगाव जिल्ह्याच्या राजकारणतील कट्टर विरोधक मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या भाजप पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘हे रंग बदलणारे सरपटणारे प्राणी आहेत’ अशी आमदार चंद्रकांत पाटील यांनी नाव न घेता खडसेंवर टीका केली. “खडसेंच कुटुंबच संभ्रमात टाकणारं आहे, आज राष्ट्रवादी आणि उद्या भाजपमध्ये. एकनाथ खडसे हे स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करणारे आहेत” अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.