डॉ.अशोक गुप्ता यांना भारत न्याय पुरस्कारने सन्मानित

0

दिल्लीमध्ये मंडी हाऊस, दिल्ली येथे एल.टी.जी. प्रेक्षागृहात ‘हमारे राम’ आणि ‘अयोध्येचे राम’ या मालिकेतील रामाची भूमिका साकारणारे अभिनेते व बॉलीवूड अभिनेते यांचा हस्ते डॉ.अशोक गुप्ता यांना भारत न्याय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, यावेळी राष्ट्रीय प्रभारी संशोधन अँड पॉलिसी ओबीसी मोर्चा भारतीय युवा सेवा संस्थेचे श्री विनय चौधरी जी आणि भारतीय युवा सेवा संस्थेचे श्री मोहित नारायण जी आणि अभिनेते डॉ. सजीन स्वेनजी, भारत न्याय पुरस्कार आणि विवाद निवारण हबचे संस्थापक डॉ. मोक्ष नारायण राम अभि मुल्लाजी आणि प्रमुख पाहुणे केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित होते. यावेळी देशाच्या कानाकोपऱ्यातील वकील, सामाजिक कार्यकर्ते आणि देशात होत असलेल्या लैंगिक अत्याचाराशी संबंधित विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रमुख उपस्थित होते. भारत सरकारच्या वाणिज्य आणि सामाजिक न्याय विभागातर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ.अशोक गुप्ता यांनी समाजात केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.हा सन्मान मिळाल्यावर डॉ.गुप्ता यांचे मित्र व सहकारी तसेच शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.अशोक गुप्ता यांना इंडिया जस्टिस अवॉर्डने सन्मानित करण्यात आले .

Leave A Reply

Your email address will not be published.