खैरखेडा येथे आमदार निधीतून सभामंडपाचे भूमिपूजन

0

हिंगोली प्रतिनिधी दिलीप गायकवाड
सेनगाव तालुक्यातील खैरखेडा. येथे हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकूळे यांच्या स्थानिक निधीतून 25 लक्ष रुपयांचे सभामंडपाचे भुमीपुजन युवा नेते शिवाजीराव मुटकूळे यांच्या हस्ते करण्यात आले असून या गावातील मंदिराला भव्यदिवे असे सभामंडप काम चालू झाले आहे गावातील सर्व भावी भक्त भगिनींना या आमदार निधीतून झालेल्या सभामंडपाच्या कामाला लोक प्रतिसाद भरपूर मिळाला असून गावातील सगळे भावीक भक्तांनी समाधान व्यक्त केले व गावातील नागरिकांनी भाजपा युवा नेते शिवाजीराव मुटकुळे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कारही केला यावेळी उपस्थित संतोषराव मरडे सर्कल प्रमुख, विजयराव धाकतोडे पाटील भाजप नेते ,सरपंच रामदास मोरे,प्रकाश मोरे,प्रमोद इंगळे,दशरथ मुंडे,बळीराम मोरे,लक्ष्मण मोरे,शंकरराव घायाळ, भिमराव मोरे,भारत भाऊ व गावंकरी मंडळी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्तित होते

Leave A Reply

Your email address will not be published.