आता शरद पवारही घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट, या मुद्द्यावर होणार चर्चा?
मुंबई । मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी मुंबईतील वर्षा या शासकीय निवास्थानी दाखल झाले आहेत. सध्या राज ठाकरे त्यांचे शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरू आहे. अशातच राजकीय वर्तुळातून आणखी मोठी घडामोड समोर आली आहे.
राज ठाकरे यांच्यानंतर आता शरद पवार देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. आज शनिवारी दुपारी दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे.त्यामुळे या भेटीत नेमकी काय चर्चा होते, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.
या भेटीत मराठा आणि ओबीसी यांच्यातील आरक्षणाचा प्रश्न तसेच राज्यातील इतर राजकीय मुद्द्यावर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या, राज्यातील मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा यावरून विरोधकांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असं सत्ताधाऱ्यांनी म्हटलं होतं. काही दिवसांपूर्वी याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह्याद्री अतिथीगृहावर पोहचले होते. यावेळी शिंदे आणि पवार यांच्यात महत्वाची चर्चा देखील झाली होती.