टेबल टेनिसमध्ये सायली वाणीचे दुहेरी यश

0

सायली वाणीने वयाच्या ८-९ वर्षांपासून टेबल टेनिस खेळायला सुरुवात केली.वयाच्या १० व्या वर्षी प्रथम मेडल मिळालं.तेव्हापासुन आजपर्यंत तीने राज्य , राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक गोल्ड, सिल्व्हर, ब्राँझ मेडल मिळवले आहे.वयाच्या १४ व्या वर्षी राष्ट्रीय स्तरावर नॅशनल चॅम्पियन मिळवली आहे.सदर चॅम्पियन शीप नाशिकच्या टेबल टेनिस इतिहास प्रथम आणण्याचा मानस तीच्या नावावर आहे.

वयाच्या १५ व्या वर्षी प्रथम आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व तीने केले आहे.ब्रिक्स साठी तीने भारताकडून खेळुन दोन ब्राँझ मेडल मिळावली आहे.महाराष्टात पुणे येथे आयोजित मीनीऑलंपीकमधे तीने वैयक्तिक पातळीवर सुवर्ण पदक आणि एक ब्राँझ पदक मिळवले आहे.आंतरराष्टीय स्तरावर साऊथ एशियन गेम्स मध्ये भारताकडून खेळुन दोन गोल्ड मेडल मिळावली आहे.

खेलोइंडिया मध्ये खेळताना दोन गोल्ड मेडल मिळावली आहे. त्याबद्दल खेलो इंडिया ने तीच कौतुक करत ती भारताची रायजींग स्टार असल्याचे म्हटले आहे.ती सातत्याने भारताचे प्रतिनिधित्व करत आहे.तीच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.