विधानसभेसाठी ठाकरे गट मुंबईतील 36 पैकी 25 जागांसाठी आग्रही? संभाव्य जागांची नावे समोर

0

मुंबई । आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून ठाकरे गटाने मुंबईतील 36 पैकी 25 जागा लढवण्याची तयारी केली आहे. मुंबईतील अधिक जागा आपल्याकडे राहव्यात यासाठी ठाकरे प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत देखील ठाकरे गटाचे मुंबईला अधिक प्राधान्य होते. त्याचप्रमाणे आता विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाने जास्तीत जास्त जागा लढवण्याची तयारी केली आहे.

यंदा ठाकरे गटकडून विधानसभा निवडणुकीसाठी अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई तर दहिसरमधून तेजस्वी घोसाळकर यांना पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीमध्ये निवडणूक लढवताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत काही जागांमध्ये अदलाबदल केली जाणार आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाणार आहे.

मुंबईतील काही जागा जिथे ठाकरेंची ताकद आहे तिथे शिवसेना ठाकरे गट महापालिका निवडणुकांचा विचार करून जागा लढवण्याचा नियोजन करत असल्याची माहिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १४ जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या. त्यातील ८ आमदार ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहेत. तर ६ आमदार शिंदेंच्या शिवसेनेसोबत आहेत.

याशिवाय २०१९च्या निवडणुकीत काँग्रेस ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका जागेवर विजय मिळवू शकला. २०२४ ची लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा ठाकरेंनी ४ पैकी ३ जागा निवडून आणल्या. त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईकडे आगामी विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी तयारी सुरू झाल्याचे दिसत आहे.

संभाव्य जागा?
अंधेरी पूर्व, कुर्ला, शिवडी, भायखळा, वरळी, माहीम, चेंबूर, भांडुप पश्चिम, विक्रोळी, मागाठाणे, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, कलिना, दहिसर, गोरेगाव, वर्सोवा, वांद्रे पूर्व, विलेपार्ले, कुलाबा, वडाळा, चांदीवली, अनुशक्ती नगर, मानखुर्द शिवाजीनगर, बोरिवली, मलबार हील

Leave A Reply

Your email address will not be published.