प्रतिभा ताई शिंदे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी निवड

0

उत्तर महाराष्ट्रात जनसंघटनेचे लढाऊ नेत्या म्हणून कार्यरत असणाऱ्या प्रतिभाताई शिंदे यांची ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे महासचिव श्री. के सी वेणूगोपाल यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.

प्रतिभाताई यांनी लोकसभा निवडणुकांअगोदरच दिल्ली येथे मा राहुलजी गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.
राहुलजी गांधी यांच्या दोन्ही भारत जोडो यात्रांमध्ये त्या राहुलजीं सोबत सक्रिय सहभागी होत्या त्याच प्रमाणे लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी खान्देश मधील प्रामुख्याने नंदुरबार येथील निवडणुकीची प्रचार धुरा सांभाळत रावेर, जळगांव, व धुळे मतदारसंघामध्ये ही महाविकास आघाडीचा प्रचार यशस्वीपने करत धुळे व नंदुरबार येथील उमेदवारांच्या विजयात महत्वपुर्ण कामगिरी बजावली होती
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मा नाना पटोले यांनी त्यांची ऑल इंडिया काँग्रेस कमेटीकडे शिफारस केल्या नुसार काँग्रेस चे अध्यक्ष मा मल्लिकार्जुन खर्गेजी यांनी त्यास मंजुरी देत काँग्रेसचे महासचिव मा के सी वेणूगोपाल यांनी त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस च्या उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली असून तसे पत्र त्यांना दिले आहे.

येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर प्रतिभाताईंना हे पद मिळाल्याने जळगांव जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला नवे बळ मिळाले असून सर्वच क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.