जळगाव | शहरातील महाबळ रोडवरील मकरंद नगर, नागेश्वर कॉलनी स्टॉपजवळील रहिवासी मंदाकिनी जनार्दन जोशी (वय ६९) यांचे शुक्रवारी (ता. २८) सायंकाळी पाचला वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्या रेल्वेचे निवृत्त अधिकारी जनार्दन जोशी यांच्या पत्नी, ‘सकाळ’चे चीफ रिपोर्टर सचिन जोशी यांच्या आई, सोहम जोशी यांच्या आजी तर हेमंत जोशी यांच्या काकू होत.
