राज्यात मुसळधार पावसाची हजेरी ! आज या जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट जारी
पुणे । गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या काही भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून आजही राज्याच्या अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून त्या पार्श्वभूमीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आज कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. या भागातील काही भागांना पावसाचा ऑरेंज आणि येलो अलर्टही देण्यात आला आहे. तसेच आज राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 40-50 किमी राहण्याची शक्यता IMD ने वर्तवली आहे.
या जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट जारी
आज राज्यातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज जारी करण्यात आला आहे. तर मुंबई शहर, मुंबई उपनगरे, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे
हवामान विभागाने आज मराठवाड्यातही पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज बुलढाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाटसह आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. या काळात काही भागात वादळी वारेही वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे या भागाला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिकी IMD ने दिली आहे.
मुंबई-पुण्यात कसे असेल हवामान?
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. आज मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे मुंबई आणि परिसराला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुणे व परिसरात आज आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मात्र काही भागात वीजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.