जळगावातील हरिविठ्ठलनगरात तरुण विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

0

जळगाव । जळगाव शहरातील हरिविठ्ठलनगरात आजीकडे माहेरी राहण्यास आलेल्या मीना सनी राठोड (२२, रा. धानोरा, ता. जळगाव) या तरुण विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. दरम्यान तिच्या आत्महत्येला पती जबाबदार असल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे.

हरिविठ्ठल नगरातील माहेर असलेल्या मीना यांचे आठ महिन्यांपूर्वीच सनी राठोड याच्याशी लग्न झाले. पती सतत मारहाण करीत असल्याने विवाहिता एक ते दीड महिन्यांपूर्वी जळगावात हरिविठ्ठलनगरात राहणाऱ्या आजीकडे आली होती. काही दिवसांपूर्वीच ती एका डॉक्टरकडे कामाला जात होती. मंगळवारी सकाळी मीनाचा भाऊ तिच्या मोबाइलवर फोन करत होता. प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने त्याच्या मित्राला पाहण्यासाठी पाठविले. त्याला मीना गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. मीना हिला जिल्हा शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.या वेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला.

आत्महत्येस पती जबाबदार; नातेवाइकांचा आरोप
दरम्यान, मीना राठोड यांना पती सतत मारहाण करीत होता, असा आरोप माहेरच्या मंडळींनी केला. या मारहाणीमुळेच विवाहिता आजीकडे आली होती, त्यानंतरही पतीने जळगावात येऊन तिला मारहाण केली. तसेच मंगळवारी सकाळीदेखील पतीनेच तिला मारले असल्याचा आरोप विवाहितेचे वडील सूरसिंग पवार व अन्य नातेवाइकांनी केला

Leave A Reply

Your email address will not be published.