मोठी बातमी! दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी असून राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. १६ जुलैपासून लेखी परीक्षेला सुरुवात होणार आहे.आपण याबाबत सविस्तर जाणून घेऊ या.
बारावीच्या सर्वसाधारण विषय आणि ऑनलाईन परीक्षा १६ जुलै ते ०८ ऑगस्ट दरम्यान होणार आहेत. तर दहावीच्या परीक्षा १६ जुलै ते ३० जुलै दरम्यान होणार आहे. दरम्यान परीक्षा संबंधीची सर्व माहिती आणि वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध केले आहेत. समाज माध्यमांवरील व्हायरल वेळापत्रक ग्राह्य धरू नये, अशा सूचना विभागीय मंडळाने दिल्या आहे.
दहावी पुरवणी परीक्षेसंदर्भात प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १६ ते ३० जुलै या कालावधी दरम्यान होणार आहे. तर बारावीची पुरवणी परिक्षेसंदर्भात प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा ही १६ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीमध्ये होणार आहे. बारावीची माहिती तंत्रज्ञान आणि सामान्यज्ञान या विषयाची परीक्षा ही ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. ही परीक्षा सात आणि आठ ऑगस्ट दरम्यान घेण्यात येणार आहे.