गुडन्यूज ! गॅस सिलिंडरच्या दरात इतक्या रुपयांची कपात, असे आहेत नवे दर

0

मुंबई । सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी आहे. जून महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ७० ते ७२ रुपयांनी कपात करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

IOCL कडून मिळालेल्या माहितीनुसार, देशातील चारही महानगरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. देशाची राजधानी दिल्ली आणि मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडर ६९.५ रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्यानंतर दोन्ही महानगरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती अनुक्रमे १६७६ आणि १६२९ रुपये झाल्या आहेत.

घरगुती गॅस सिलिंडरचे नवे दर
घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही. ९ मार्च घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत शेवटचा बदल झाला होता. त्यावेळी एलपीजीच्या किमतीत तब्बल १०० रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यानंतर देशाची राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ८०३ रुपये इतकी झाली. मुंबईत घरगुती गॅस सिलिंडरचा ८२९ रुपये, चेन्नईत ८१८.५० रुपये इतका आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.