महावितरणचा अजब कारभार ! मीटरचे रिडींग न घेता ग्राहकांना सरासरी बिल

0

नंदुरबार : महावितरणचा अजब कारभार शहाद्यामध्ये पाहण्यास मिळत आहे. घरोघरी जाऊन मीटरचे रिडींग न घेता ग्राहकांना सरासरी बिलाची आकारणी केली जात आहे. हा प्रकार मागील चार- पाच महिन्यांपासून केला जात आहे. यामुळे अव्वाच्या सव्वा बिल येत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

अधिकृत वीज कनेक्शन घेतलेल्या ग्राहकांना नियमानुसार मीटर रिडींग घेऊन बिल आकारणी करणे आवश्यक आहे. मात्र नंदुरबारजिल्ह्यातील शहादा शहरात वीज वितरण कंपनीकडून शहरातील नियमित वीज ग्राहकांना सरासरी वीज बिले पाठवून अव्वाच्या सव्वा वीज बिल वसूल केले जात आहे. मीटर सुरू असूनही ग्राहकांना सरासरी बिल पाठविल्याने ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

वीज वितरण (Mahavitaran) कंपनीकडून जानेवारी महिन्यापासून अत्याधुनिक वीज मीटर बसविण्यासोबत नवीन तंत्रज्ञानाने प्रत्यक्ष रिडिंग न घेता डिजिटल वीज बिल ग्राहकांना दिले जात आहे. गेल्या तीन- चार महिन्यांपासून नियमित वीज ग्राहकांना प्रत्यक्ष रिडिंग न घेता वीज वितरण कंपनीकडून सरासरी वीज बिलांचे वाटप केले जात आहे. या बिलांवर वीज रिडिंग उपलब्ध नाही; असे नमूद करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.