वाहनाच्या धडकेत जखमी सालदाराचा उपचारादरम्यान मृत्यू

 नशिराबादजवळ झाला होता अपघात : तीन दिवसानंतर पटली ओळख

0

जळगाव : तालुक्यातील नशिराबाद येथील एका तरूण सालदाराला भरधाव अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना  घडली होती. मात्र, शनिवारपर्यंत या युवकाची ओळख पटली नव्हती. रविवारी ओळख पटल्यानंतर नातेवाईकांना कळविले. हिरालाल सखाराम सोलंकी (वय ३६, रा. दोंदवाडा जि. बडवानी, मध्यप्रदेश) असे मयत इसमाचे नाव आहे.

हिरालाल हा आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी यांच्यासह राहत होता. सालदारकी करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. १६ मे रोजी नशिराबादजवळ जय भोले ढाबाजवळून जाताना पहाटे ३ वाजेच्या सुमारास त्याला महामार्गावरील भरधाव अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिली. या धडकेत तो गंभीर जखमी झाला होता.

त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शनिवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या नातेवाईकांना बोलावून रविवारी हिरालाल याचा मृतदेह देण्यात आला.
याप्रकरणी नशिराबाद पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.