बसची कारला जोरदार धडक ; तीन जण जागीच ठार, 2 वर्षांचा चिमुकला बचावला

0

नांदगाव । नाशिकमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. नांदगाव -संभाजीनगर मार्गांवर गंगाधरी जवळ एसटी बसने मारुती कारला समोरून जबर धडक दिल्यानं भीषण अपघात झाला. या भीषण अपघात कारमधील तीन जणांचा मृत्यू झाला असून त्यात 2 वर्षांचा चिमुकला मात्र बचावला आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि एक पुरुषाचा समावेश आहे .पोलिसांनी एसटी चालकास ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नांदगाव – छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील गंगाधरी येथे मनमाड आगाराची बस चाळीसगावहून मनमाडकडे येत असताना बस आणि मारुती कारची जोरदार धडक झाली. या घटनेत मात्र तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

बसचालक बस ही भरधाव वेगात चालवत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. समोर असणाऱ्या वाहनाला ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न बसचालकाने केला. या नादात समोरून येणाऱ्या कारला बसने धडक दिली असा आरोप बसमधील प्रवाशांनी केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी एसटी चालकास ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.