फैजपूर नगरपरिषदेच्या वतीने मतदानाबाबत जनजागृती
रावेर । रावेर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदारांनी जास्तीत जास्त मतदान केले पाहिजे, म्हणून फैजपूर नगरपरिषदचे वतीने फैजपूर शहरात वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. फैजपूर नगरपरिषद चे प्रभारी मुख्याधिकारी भूषण वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मतदाना बाबत जनजागृती व्हावी म्हणून दिनांक ७ मे रोजी भारतीय निवडणूक आयोगाचे एकी मॅसस्कॉट द्वारे मतदान जनजागृती करण्यात आली.
एकी मॅसस्कॉट द्वारे बस स्टँड परिसर, मार्केट, शॉपिंग कॉम्प्लेक्स येथे मतदान जनजागृती व माहिती देण्यात आली. उपस्थित नागरिक व मतदार यांनी ‘एकी मॅसस्कॉट’ सोबत सेल्फी घेऊन मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला. ‘एकी मॅसस्कॉट’ ला बघण्यासाठी नागरिक ठिक ठिकाणी गर्दी करत असून एकी हे बालगोपाळांच्या आकर्षणाचे केंद्र बनले होते