सुप्रिया सुळेंचा महाजनांना फोन, गुलाबराव-महाजनांसह सुमित पाटीलही बिनविरोध होणार? जिल्हा बँकेत आज मोठ्या घडामोडी!

0

जळगाव जिल्हा बँकेची रणधुमाळी सुरू आहे. माघारीचा दिवस येऊन ठेपला. मात्र अद्याप या निवडणुकीत महायुतीचा जागांचा तिढा सुटलेला नाही, दुसरीकडे महाविकास आघाडीला एक जागा देऊन निवडणूक बिनविरोध करण्यासाठी देखील नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी थेट सुप्रिया सुळे यांचा महायुतीचे नेते गिरीश महाजन यांना फोन आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मुक्ताईनगर आणि चोपडा या ठिकाणी भाजप व शिवसेना शिंदे गट आमने-सामने असून याच जागांवरून तिढा कायम आहे, आतापर्यंत महायुतीच्या जवळपास नेत्यांच्या पाच बैठका पार पडूनही तिढा सुटलेला नाही, तर दुसरीकडे महाविकास आघाडीला एक जागा देऊन इतर सर्व ठिकाणी त्यांच्या उमेदवारांनी माघार घेण्याबाबतचा प्रस्ताव आला आहे. यासाठी थेट शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचा मंत्री गिरीश महाजन यांना फोन आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी देखील नेत्यांचे शर्तीचे प्रयत्न सुरू असून काल रात्री उशिरापर्यंत अजिंठा विश्रामगृहात या संदर्भात खलबते सुरू होती.जिल्हा बँक निवडणुकीत आतापर्यंत शिवसेना शिंदे गटाच्या दोन भाजपची एक व राष्ट्रवादी अजित पवार गटाची एक जागा बिनविरोध झाली आहे, आज माघारीचा अंतिम दिवस आहे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात दोघेही भाजपचे उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावा याबद्दलच्या सूचना गिरीश महाजन यांनी केले आहे. त्यामुळे त्यांची देखील जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात त्यांच्याच कार्यकर्त्यांचा अर्ज असल्याने कार्यकर्त्याच्या माघारी नंतर मंत्री गिरीश महाजन यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे, आज माघारी तर शेवटचा दिवस असल्याने सहा ते सात जागा बिनविरोध होण्याची शक्यता मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचे चिरंजीव सुमित पाटील हे देखील बिनविरोध होण्याची शक्यता

शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचे चिरंजीव सुमित पाटील यांचा अर्ज जिल्हा बँक निवडणुकीत बाद ठरविण्यात आला होता. यानंतर सुमित पाटील यांनी प्रचंड संताप व्यक्त करत थेट सत्ताधाऱ्यांच्या दबावातून अर्ज बाद झाल्याचा आरोप केला होता अदृश्य शक्ती कोण असा सवाल देखील उपस्थित केला होता, त्यानंतर सुमित पाटील यांनी विभागीय सहनिबंधकांकडे अपील केल्यानंतर त्यांचा अर्ज वैध ठरला आहे. आता सुमित पाटील यांच्या विरोधात असलेला भाजपचे उमेदवार माघार घेऊन सुमित पाटील यांना बिनविरोध करण्याचे देखील हालचाली सुरू आहेत, मंत्री गिरीश महाजन यांनी काल पत्रकारांशी बोलताना तशी संकेत दिली असून जागा बिनविरोध झाली तर अदृश्य शक्ती कामाला आली असं समजायचं असं सूचक वक्तव्य देखील आमदार किशोर पाटील यांनी केला आहे त्यामुळे सुमित पाटील यांच्या बिनविरोध निवडीकडे देखील लक्ष लागला आहे

Leave A Reply

Your email address will not be published.