मनोज जरांगे यांचा दुसरा बॉम्ब, महाराष्ट्रात मोठी खळबळ; म्हणाले..

0

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एक ऑडिओ क्लिप महाराष्ट्राला ऐकवून भाजपला घाम फोडला आहे. एकनाथ शिंदेंनी भाजपकडून मनोज जरांगे यांना देण्यासाठी 500 कोटी घेतल्याचं या क्लिपमध्ये भाजपचे लोक म्हणताना दिसत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. क्लिप बॉम्बनंतर मनोज जरांगे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. आता हे दोन्ही पक्ष मिळून माझ्या मागे हात धुवून लागणार आहेत, असा खळबळजनक दावा मनोज जरांगे यांनी केला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी हा दावा केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र हादरला आहे.

मुख्यमंत्र्यांनी त्या क्लिपची चौकशी करणार असल्याचं जाहीर केलं आहे. चौकशीतून सत्य बाहेर येईल असं वाटतं. पण ते सत्य असल्याने दोन्ही पक्ष त्यांनाच वाचवण्याचा प्रयत्न करतील, अशी शंका आहे. अशी कुजबुज आहे की, दोन्ही पक्ष माझ्या मागे लागतील. कारण मी प्रचंड मोठं षडयंत्र उघडं पाडलं आहे. त्यामुळे आता ते एक होतील. माझ्या मागे लागतील. त्यांच्याकडून मोठा गुन्हा झाला आहे. पडद्यामागे गोरगरीब आणि मराठ्यांविषयी किती भयंकर प्लानिंग शिजतो, किती टोकाचा निर्णय घेतला जातो आणि प्रत्यक्षात समोर गोड बोललं जातं हे उघडं झालं आहे. पाठिमागे कट शिजवायचे हा साधा विषय नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.