समाजरत्न नानजीभाई खीमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या जन्मदिनानिमित्त उत्साहपूर्ण कार्यक्रम
“शून्यातून सर्जन जय भगवान!!”
समाजरत्न व संस्थाध्यक्ष श्री. नानजीभाई खीमजीभाई ठक्कर ठाणावाला यांचा जन्मदिन शैक्षणिक संस्थांमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी श्री. नानजीभाई खीमजीभाई ठक्कर ठाणावाला यांना निरोगी, दीर्घायुषी आणि सुखमय जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी समाजातील दिनदुबळ्या व गरजू व्यक्तींसाठी सुरू ठेवलेले सेवाकार्य अखंडपणे सुरू राहावे, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.
या प्रसंगी भागवत कथाकार नाना महाराज देशमुख, मानद मंत्री नटवरलाल वीरजीभाई ठक्कर, श्री. राजेंद्र पुराणी, श्री. राजेंद्र पांडे, शेठ टी. जे. एज्युकेशन सोसायटीचे कर्मचारी, सौ. सुवर्णा ठाकरे, डॉ. विश्वासराव आरोटे, श्री. गणपत ठाकरे, श्री. सुदेश ठाकरे, नीता जोशी, श्री. मनोहर दिवाणे आनंदी, श्री. दिनेशभाई कोटक, श्री. कांती वाघमारे, श्री. विनर बिंद्रा, श्री. प्रेम तिवारी, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. दिलीप पाटील, शेठ टी. जे. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या मनीषाबेन ठक्कर, इंग्रजी शाळा व महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती लिडिया सालियन, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक तसेच नातेवाईक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
समाजसेवेच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल विविध ठिकाणांहून आलेल्या नागरिकांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या. चंद्रकांत महाराज डुंबरे यांनी श्री. नानजीभाई ठक्कर यांचा स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. जनसेवेसाठी आपले जीवन समर्पित करणारे श्री. नानजीभाई ठक्कर हे “चालते-बोलते जालाराम बाप्पा” असल्याचे डुंबरे महाराज यांनी नमूद केले.
यावेळी श्री. नानजीभाई ठक्कर यांनी आपल्या सेवाभावी कार्यामागील भावना व्यक्त करताना, “मी काही करत नाही; ईश्वराने मला केवळ निमित्त बनवले आहे. माझ्या दारी येणारी व्यक्ती रिकाम्या हाताने परत जाऊ नये, याची मी विशेष काळजी घेतो,” असे सांगितले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांच्या जन्मदिनानिमित्त डिग्री कॉलेजतर्फे संस्थेच्या वार्षिक अहवालाचे त्यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी श्री. नानजीभाई ठक्कर यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समाजसेवेचे कार्य अधिक व्यापकपणे करण्यासाठी निरंतर ऊर्जा मिळावी, अशा मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
