जळगाव-म्हसावद रेल्वेमार्गावर १२ तासांचा ब्लॉक; ६ मेमू रद्द, १९ एक्स्प्रेस गाड्या थांबणार

0

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील जळगाव- म्हसावद दरम्यान स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग प्रणाली बसवण्यासाठी ८ सप्टेंबर रोजी १२ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे ६ मेमू गाड्या पूर्णपणे रद्द केल्या आहेत. तर १९ एक्स्प्रेस गाड्या वेगवेगळ्या स्थानकांवर ३ तासांपर्यंत रोखून ठेवल्या जाणार आहे. तत्पूर्वी ७ सप्टेंबर रोजी पूर्व-काम (प्री-नॉन-इंटरलॉकिंग) केले जाईल. त्यानंतर ८ सप्टेंबर रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ब्लॉक असेल.

इगतपुरी भुसावळ मेमू (गाडी क्र. ११११९) व भुसावळ इगतपुरी मेमू (गाडी क्र. १११२०)
भुसावळ देवळाली मेमू (गाडी क्र. ११११३) व देवळाली भुसावळ मेमू (गाडी क्र. ११११४)
नाशिक रोड बडनेरा मेमू (गाडी क्र. ६११२९) व बडनेरा नाशिक रोड मेमू (गाडी क्र. ६११३०)

वंदे भारत आणि दादर एक्सप्रेसच्या वेळेत बदल
अजनी पुणे वंदे भारत एक्सप्रेस २६१०२ ही गाडी ८ सप्टेंबर रोजी अजनी येथून सकाळी ९:५० ऐवजी ३ तास उशिराने म्हणजेच दुपारी १२:५० वाजता सुटेल.
भुसावळ दादर एक्सप्रेस १९००४ : ही गाडी भुसावळ येथून सायंकाळी ५:४० ऐवजी १ तास उशिराने म्हणजेच ६:४० वाजता सुटेल. त्यामुळे याचा प्रवाशांना फटका बसणार आहे.

प्रवासाचे नियोजन करा
८ सप्टेंबर रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ६ दरम्यान प्रवास करणार असाल, तर ट्रेनचे लाईव्ह स्टेटस तपासूनच घराबाहेर पडा. गरज नसेल तर प्रवास दुसऱ्या दिवशी करा. किंवा पर्यायी साधनाचा वापर करावा. प्रवासाच्या दिवशी रेल्वेच्या वेबसाइटवर गाड्यांचे लोकेशन तपासून वेळेची खात्री करून घ्यावी.

Leave A Reply

Your email address will not be published.