सप्टेंबर महिन्यात पावसाबद्दल धक्कादायक अंदाज

0

जुलै महिन्यात दमदार पाऊस झाला. जून महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. मात्र, त्याची भर एकट्या जुलै महिन्यात भरून निघाली. ऑगस्ट महिन्यातही अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यातच आता मोठी अपडेट पुढे येत आहे. राज्यात शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतिक्षा असतानाच एक वाईट बातमी पुढे येतंय. सप्टेंबर महिन्यातही अपेक्षित पाऊस होण्याची शक्यता कमीच आहे. तसा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला. पिके धोक्यात आहेत आणि पावसाने पाठ फिरवली. राज्यातील धरणांची स्थिती चांगली आहे. जुलै महिन्यात झालेल्या पावसाने धरणातील पाणी पातळीत वाढ झाली. धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने दिलासा मिळाला. एल निनोचे संकट यंदाच्या मॉन्सूनवर असणार असल्याचे सुरूवातीपासून सांगितले जाते. त्यातच आता पावसाने पाठ फिरवली. राज्यात सप्टेंबरमध्ये सुद्धा पाऊस कमी असल्याचा अंदाज असल्याने संकट वाढताना दिसतंय.

ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर सप्टेंबरमध्ये ही सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांवर यावर्षी दुष्काळाचे सावट आहे. पावसाने पूर्णपणे पाठ फिरवली आहे. मराठवाड्यात काही जिल्ह्यात अद्यापही पाऊस कोसळला नाही. त्यातच भारतीय हवामान विभागाने सप्टेंबर महिन्यात आता हा मोठा इशारा दिला आहे.

1 जून ते 31 ऑगस्ट या कालावधीत राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये अपुरा पाऊस झाल्याची नोंद आहे. भारतीय हवामान विभागाने कमी पावसाचा अंदाज त्यामध्येच वर्तवला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट आहे. राज्यातील काही भागात दुष्काळाचे थेट संकेत देण्यात आलेत. बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये अजूनही मोठ्या पावसाची प्रतिक्षा आहे.

इतरही राज्यात पावसाने पाठ फिरवल्याचे बघायला मिळत आहे. एल निनोचा जो अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी दिला तो खरा तर होणार नाही ना.. अशी शंका उपस्थित केली जात आहे. प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाला आहे. ज्याचा थेट परिणाम भारतातील मॉन्सूनवर होईल, असे सांगितले जात आहे. त्यातच आता सप्टेंबर महिन्याचा अंदाज पुढे आला.

Leave A Reply

Your email address will not be published.