भुसावळ येथे १७ जुलै रोजी रोजगार व समुपदेशन मेळाव्याचे आयोजन

0

जळगाव । जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने उमेदवारांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार व समुपदेशन मेळाव्याचे आयोजन शुक्रवार, दि. १७ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे.

हा मेळावा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भुसावळ, जामनेर रोड, भुसावळ, जि. जळगाव येथे होणार आहे. मेळाव्यात प्रामुख्याने सुप्रिम इंडस्ट्रिज प्रा. लि., जळगाव व युवा शक्ती फाउंडेशन आदी नामांकित उद्योजक सहभागी होणार आहेत.

मेळाव्यात दहावी, बारावी, आयटीआय तसेच विविध शाखांतील पदवीधर, बी.कॉम., एम.कॉम. शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.

मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरील उपलब्ध रिक्त पदांसाठी आपल्या युजर आयडी व पासवर्डद्वारे लॉग-इन करून अर्ज करावा. ज्या उमेदवारांनी अद्याप नावनोंदणी केलेली नाही, त्यांनीही सर्व शैक्षणिक पात्रतेच्या आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीच्या दिवशी मेळाव्यास उपस्थित राहावे.

याबाबत काही अडचण असल्यास अथवा अधिक माहितीसाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ या वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी. एस. ग्राऊंडजवळ, जळगाव येथे प्रत्यक्ष भेट द्यावी किंवा कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक ०२५७-२९५९७९० येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संदीप ज्ञा. गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.