समाजभूषण हितेश गायकवाड, छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानदीप पुरस्काराने सन्मानित

0

स्वराज्यातून सुराज्याच्या नवनिर्माणा चे अधिष्ठान म्हणजे स्वराज्य प्रतिष्ठान. आणि शिवक्रांती प्रतिष्ठान तर्फे शिव राज्याभिषेक गौरव दिना निमित्त छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानदीप गौरव व राजमाता जिजाऊ कर्तृत्व गौरव पुरस्कार मोठ्या दिमाखात चार जुलै मुंबई येथे पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन येथील मैत्री संस्था आणि सामाजिक समन्वय समिती सोबतच सर्वेसर्वा अध्यक्ष प्रमोद आप्पा पाटील, स्वराज्य प्रतिष्ठानचे सचिव श्री. सुरेश भोईर सर, तसेच शिवक्रांती प्रतिष्ठानचे सर्वे सर्व डॉ.राजूभाऊ चौधरी यांच्या प्रयत्नातून या सोहळ्याला रंगतदार चकाकी आली होती.

उद्घाटक मध्ये डॉ. सुधाकर सुराडकर, माजी राज्यमंत्री ज्योतीताई ठाकरे आणि संभाजीराव राजे जाधव राव यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात पार पडला. समाजासाठी विशेष प्रकारचे कार्य करणाऱ्या विशेष लोकांसाठी हा पुरस्कार जाहीर केलेला असतो त्यात प्रामुख्याने आरोग्य विभागाला पहिले प्राधान्य दिलेले होते. बऱ्याच धावपळ करणाऱ्या आणि मेहनती लोकांना या संस्थेने त्यांचा उत्साह वाढवण्या साठी पाचारण केलेले होते या वेळेस कोणाच्याही सुखदुःखात धावून जाणारे आणि योग्य ते शासना मार्फत मदत करणारे समाज भूषण,समाज वैभव हितेश पांडुरंग गायकवाड (आरोग्य विभाग) यांचा शाल आणि स्वराज्य ट्रॉफी देऊन माना सन्मानाने सत्कार करण्यात आला यावेळेस प्रमुख अतिथी म्हणून माननीय अभिजीत राणे, शिवमती अनिताताई काळे, सुभाषराव गायकवाड,प्रेरणा गायकवाड,अभिनेत्री पियू चव्हाण, मंगला परब,दिलीप नारद,सुरेश साळवी आणि संगीता गुरव उपस्थित होते माणसाने माणुसकी साठी प्रत्येक माणसाला ह्याच जन्मात ओळखले पाहिजे आणि मदतीचा हात पुढे केल्या गेला पाहिजे या शब्दांमध्ये व वक्त्यांनी आपल्या आदर्श मधून स्पष्ट केले. रवी भातडे,एम. नटराज आशिष सातपुते,उद्धव झगडे आणि संस्थांचे सर्व आदरणीय निमंत्रक आभार प्रदर्शन करून या बहारदार सोहळ्याची सांगता केल्या गेली.

Leave A Reply

Your email address will not be published.