मराठी चित्रपट महामंडळात मेघराज राजे भोसले ह्यांचे माया ममता,टीम मार्फत स्वागत

0

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये परत एकदा सर्वांचे लाडके, गोड स्वभावाचे मेघराज राजे भोसले अध्यक्ष पदी स्थानापन्न झाले.
कलाकारांच्या समस्या, कलाकारांच्या अडचणी आणि कलाकारांचे पुढील भवितव्य या सगळ्या बाबींचा विचार करूनच, नवनिर्वाचित अध्यक्ष मेघराज राजे भोसले साहेबांनी, कार्यक्रमाला आलेल्या स्पॉट बॉय पासून ते डायरेक्टर,प्रोडूसर पर्यंत सर्वांचे हसत मुखाने समस्या सोडवण्या साठी कटीबद्ध असल्याचे स्वागता तून जाहीर केले. यावेळेस वेगवेगळ्या स्तरातून आलेल्या वेगवेगळ्या कलावंतांनी आपापल्या परीने साहेबांचे सुद्धा दिलखुलास स्वागत केले.

अंधेरी मुंबई स्थित ऑफिसचे सर्वेसर्वा अर्थातच विशाल पवार साहेब आणि हेमंत परब यांनी या कार्यक्रमाचे नियोजन आखले होते. यावेळेस प्रामुख्याने येणाऱ्या हृदयस्पर्शी चित्रपट माया ममता, चे निर्माते, निर्देशक वाघ साहेब यांनी मेघराज राजे भोसले आणि उपस्थितांचे अभिनंदन करताना आपल्या रुबाबदार शैलीमध्ये अक्षरशः सर्वांचे मन जिंकून घेतले. माया ममता टीम चे सह निर्माता प्रदीपजी जाधव,गायक अजय अटकाळे, प्रोडक्शन प्रमुख दिनकर अवचार, अभिनेता सुनील काटे,सुदर्शन खराटे,मोहन बोदडे, मुक्ताईनगर बोदवड चे दिग्दर्शक रामेश्वर लोहार आणि उपस्थित असलेले मुंबई परिसरातील वेगवेगळ्या दर्जाचे कलावंत उपस्थित होते.

प्रत्येकाचे उत्तर देताना साहेब मात्र स्मित हास्य देऊन ते शब्द रूपाने पूर्ण करत होते. काटेकोर नियम आणि मराठी चित्रपटांच्या विकासाची हमी या तत्त्वानुसार पुढील महामंडळा चा कार्यक्रम हा सर्वच ,कलाकारांचा उत्कर्ष वर्धक होईल अशाच पद्धतीचा असेल,अशा आशयाचा विषय अध्यक्ष साहेबांनी या ठिकाणी सांगितला. या कार्यक्रमा साठी अध्यक्ष साहेबां सोबतच सह कार्यवाह दीपक कदम साहेब, संचालक मध्ये सुभाष नकाशे साहेब,गणेश गारगोटे साहेब तसेच पल्लवी पाटील, यांनी सुद्धा कलाकारांना मार्गदर्शन केले. यावेळेस उपस्थितां मध्ये हितेश गायकवाड,एम.नटराज., रवी भातडे,भारत कोडग,पल्लवी पाटील,अजय अटकाळे, प्रदीप जाधव,सुनील काटे आशिष सातपुते( मिमिक्री) उद्धव झगडे, लक्ष्मण इंगळे आणि सुनील भालेराव उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.