मालाड येथील वाघेश्वरी मंदिर पर्यटन स्थळ म्हणून घोषित करा ; सुनील प्रभू यांची वनमंत्री गणेश नाईकांकडे केली मागणी

0

मुंबई | मुंबईतील मालाड पूर्व येथील वाघेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार, मंदिर परिसराचे सुशोभिकरण तसेच येथील रस्त्याचे खडीकरण/ डांबरीकरण करण्यात यावे तसेच मंदिर परिसर पर्यटन स्थळ म्हणून घोषीत करावे, अशी मागणी शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना एका पत्राद्वारे केली आहे

मुंबईतील मालाड पूर्व दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील संजय गांधी उद्यानांतर्गत असलेल्या मालाड मधील संजय नगर येथे वाघेश्वरी देवीचे अत्यंत प्राचीन मंदिर अस्तित्वात असून या मंदिरास मोठ्या संख्येने भाविक व पर्यटक नियमित भेट देत असतात. प्रत्येक वर्षी अगदी पावसाळ्याच्या दिवसात सुद्धा येथे भाविक व पर्यटकांची मोठया प्रमाणात गर्दी होते. परंतु या मंदिराकडे जाणारा रस्ता मातीचा रस्ता असून पावसाळयात तो वाहून जातो त्यामुळे या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. तसेच अत्यंत प्राचीन जुन्या व जीर्ण वाघेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात येऊन मंदिर परिसर सुशोभित करण्याची देखील नितांत आवश्यकता आहे. हे वाघेश्वरी मंदिर परिसर पर्यटन स्थळ म्हणून घोषीत करण्याची येथील स्थानिकांनी व लोकप्रतिनिधींनी लेखी पत्राद्वारे मागणी करुनही अद्याप यावर कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही, याकडे विधानसभेचे शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू यांनी एका पत्राद्वारे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे लक्ष वेधले आहे.

आपल्या पत्रात शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना विनंती केली आहे की वाघेश्वरी मंदिराप्रती श्रध्दास्थान असलेल्या या परिसरातील नागरिक तसेच मंदिरास भेटी देणारे भाविक व पर्यटकांना सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याकरिता मंदिराचा जीर्णोद्वार, सुशोभिकरण आणि रस्त्याचे खडीकरण/ डांबरीकरण करावे तसेच या मंदिर क्षेत्रास पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात यावेत अशी मागणी शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू यांनी पत्रात केली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.