सारिका राजपूत पोलीस दलात निवड झाल्याबद्दल भडणे ग्रामस्थांना तर्फे सत्कार

0

अशिक्षित आई-वडिलांनी मुलीला घडवले पोलीस 
मुल आणि चूल च्या पलीकडे जाऊन आजही सावित्रीच्या लेकीने आपल्या स्वतःच्या पायावर आई-वडील व पतीच्या मार्गदर्शनामुळे पोलीस भरतीत पास होऊन पोलीस दलात दाखल झाल्याने आई वडील व सासू-सासरे यांची मान अभिमानाने उंचावली
शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे शहादा तालुक्यातील डोंगरगाव येथील सुनबाई सारिका दीपक राजपूत यांची नुकतीच नागपूर पोलीस मुख्यालयात पोलीस दलात निवड झाल्याबद्दल
भडणे ग्रामस्थांनफे सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिंदखेडा प ,स माजी सभापती विश्वनाथ पाटील तर प्रमुख पाहुणे बातमी वेधचे संपादक महेंद्र गिरासे होते शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील भागवत गिरासे यांची भाची सारिका दीपक राजपुत
डोंगरगाव यांची पोलीस दलात निवड झाल्याबद्दल भडणे गावकऱ्यांतर्फे सत्काराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सारिका राजपूत यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी प्राध्यापक मनोज निकम पुरषोत्तम गोसावी माजी सरपंच देवसिग गिरासे दत्तात्रय माळी भडणे येथील राज्यपाल पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज माळी माजी उपसरपंच जगतसिंग गिरासे योगेश गिरासे गोपाल राऊल कोमल गिरासे रामसिंग गिरासे समता परिषद चे योगेश माळी आदी यावेळी उपस्थित होते
सारिका राजपूत शहादा तालुक्यातील कर्जोत येथील रहिवासी आई-वडिलांची परिस्थिती बेताची शिक्षण बीएससी शहादा येथे केले पुढे लग्न झाल्यावर पती दीपक राजपूत यांनी आपली पत्नी सारिका हिला लहानपणापासूनच पोलीस दलात नोकरी करण्याचे स्वप्न उराशी बाळगून ते स्वप्न प्रत्यक्षात आई-वडील व पती यांच्या मार्गदर्शनामुळे आपल्या मेहनतीने व जिद्दीने साकार करून दाखवले

प्रत्येक विद्यार्थिनी यश हमखास मिळते यासाठी जिद्द आणि चिकाटी आणि स्वतःचा आत्मविश्वास महत्वाचा आहे आपण कुठल्याही शिक्षण क्षेत्रात स्वतःविषयी कमी लेखू नका प्रयत्न करा ध्येय डोळ्यासमोर ठेवून प्रयत्न करा यश हमखास मिळते तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवले हार न मानता ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न केले यामुळे मला यश मिळाले या यशात माझे पती तसेच सासू-सासरे व आई वडील यांच मोलाचं मार्गदर्शन मिळाले आई वडील अशिक्षित असले तरी मला नेहमीच शिक्षणासाठी प्रोत्साहन करून माझा आत्मविश्वास वाढवला तर पती दीपक राजपूत यांनी मला पोलीस दलात भरती व शिक्षणासाठी पयत्नांची पराकाष्टा केली यामुळेच त्यांच्या मार्गदर्शनामुळे पोलीस दलात निवड झाली
सारिका राजपूत,,,,,,,,
यावेळी सत्कार समारंभाला गावकरी व समाज बांधव मोठे संख्येने उपस्थित होते सारिका राजपूत ही अलाणे येथील माजी सरपंच कोमल सिंग राजपूत यांची सुनबाई आहे

Leave A Reply

Your email address will not be published.