जळगाव जिल्हा परिषदच्या नवनियुक्त CEO करिश्मा नायर यांनी स्वीकारला पदभार

0

जळगाव । जळगाव जिल्हा परिषदच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून करिश्मा नायर यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारताच प्रशासनात ॲक्शन मोड दाखवत कामकाजाची झपाट्याने सुरुवात केली. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्या हस्ते त्यांना पदभार देण्यात आला. या वेळी जिल्हा परिषदेतील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

माजी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांची मुंबई येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या महत्त्वाच्या पदावर बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी करिश्मा नायर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या यापूर्वी नाशिक महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होत्या.

पदभार स्वीकारल्यानंतर करिश्मा नायर यांनी वेळ न दवडता जिल्हा परिषदेच्या नवीन आणि जुन्या दोन्ही प्रशासकीय इमारतींना भेट देत सर्व विभागांचा सविस्तर आढावा घेतला. प्रत्येक विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांनी कामकाजाची माहिती घेतली आणि आवश्यक मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. नव्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सक्रिय आणि सकारात्मक कामकाज पद्धतीमुळे जिल्हा परिषदेच्या विकासकामांना अधिक वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.