टाकेद परिसरातील विज प्रश्नासंदर्भात अधीक्षक अभियंता यांना निवेदन
दहा दिवसांत टाकेद गावठाण परिसरात थ्री फेज लाईट कायमस्वरूपी सुरू होणार : आर जे थल
इगतपुरी |
इगतपुरी तालुक्यातील परदेशवाडी सबस्टेशन अंतर्गत टाकेद परिसरातील वीज प्रश्नासंदर्भात टाकेद येथील सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांचे शिष्टमंडळाने वीज वितरणच्या अधीक्षक अभियंता आर जे थल यांची भेट घेऊन विजेचे प्रश्न सोडविण्यासाठी निवेदन दिले आहे.इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद बु व परिसर येथे परदेशवाडी सबस्टेशन मार्फत RDSS योजनेअंतर्गत पूर्ण झालेली गावठाण थ्री फेज लाईन तात्काळ चालू करणेत यावी व परदेशवाडी सबस्टेशन याठिकाणी 5MVA ऐवजी 10 MVA चे 2 (5 to 10 Aggumentation) ट्रान्सफॉर्मर तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावे.व टाकेद परिसराला कायमस्वरूपी थ्री फेज वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी या निवेदनात सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनी केली आहे.


दरम्यान आमदार माणिकराव कोकाटे यांचे प्रयत्नातून परदेशवाडी सबस्टेशन अंतर्गत विद्युत पुरवठा होणाऱ्या सर्वतीर्थ टाकेद बु व परिसर येथे सुधारित वितरण क्षेत्र योजने अंतर्गत (RDSS)गावठाण क्षेत्रात 24 तास थ्री फेज वीज पुरवठा करण्यासाठी सन 2024- 25 मध्ये योजना राबविण्यात आली.सदर योजनेंतर्गत परदेशवाडी सबस्टेशन ते टाकेद गावठाण पर्यंत कामकाज पूर्ण असून गेल्या अनेक दिवसांपासून केवळ वीज पुरवठा करण्यासाठी परवानगी मिळाली नाही या कारणास्तव ही नवीन योजना बंद आहे.त्यात संबंधित योजनेचे कामकाज करणारे कंत्राटदार याकडे दुर्लक्ष करत आहे.दरम्यान टाकेद ही या भागातील एकमेव मुख्य बाजारपेठ असल्याने याठिकाणी उद्योग व्यवसायासाठी दिवसा थ्री फेज लाईटची अत्यंत आवश्यकता असून थ्री फेज लाईटच्या गैरसोयीमुळे या भागातील अनेक ग्रामस्थ नागरिक शेतकरी बांधवांची मोठी गैरसोय होत आहे.योजना पूर्ण असून सदर योजनेंतर्गत आमच्या स्थानिक गावठाण कार्यक्षेत्रातील ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळत नसेल तर या योजनेचा नेमक उद्देश काय…?असा प्रश्न सामान्य ग्राहकांना पडल्याशिवाय राहत नाही.दरम्यान सुधारित वितरण क्षेत्र योजना (RDSS – Revamped Distribution Sector Scheme) ही भारत सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे.जीचा उद्देश २०२४-२५ पर्यंत वीज वितरण कंपन्यांची (DISCOMs) कार्यक्षमता आणि आर्थिक स्थिती सुधारणे आहे. या योजनेंतर्गत वीज गळती (AT&C loss) १२-१५% पर्यंत कमी करणे आणि कृषी फीडरचे विलगीकरण करून प्रीपेड स्मार्ट मीटर लावून वीज ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे.
आरडीएसएस योजनेची (RDSS)मुख्य माहिती:
उद्दिष्ट: वितरण क्षेत्राचे आधुनिकीकरण करणे व वीज वितरण कंपन्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि तांत्रिक व व्यावसायिक तोटा कमी करणे.
कालावधी व खर्च: ही योजना ५ वर्षांसाठी (२०२१-२२ ते २०२५-२६) असूनयासाठी ३०३७५८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.प्रमुख घटक:स्मार्ट मीटरिंग: सर्व वीज ग्राहकांना प्री-पेड स्मार्ट मीटर बसवणे. पायाभूत सुविधा सुधारणा: कृषी फीडरचे विलगीकरण (Separation)उपकेंद्रे आणि वितरण रेषा मजबूत करणे.तांत्रिक मदत: आयटी (IT) प्रणाली सक्षम करणे आणि डेटा ॲनालिटिक्स वापरणे.अंमलबजावणी: REC (Rural Electrification Corporation) आणि PFC (Power Finance Corporation) या योजनेसाठी नोडल एजन्सी म्हणून काम करत आहेत.लक्ष्य (Targets): २०२४-२५ पर्यंत संपूर्ण भारतातील AT&C तोटा १२-१५% वर आणणे आणि ACS-ARR (सरासरी खर्च आणि महसूल) मधील तफावत शून्यावर आणणे.ही योजना वीज वितरणातील त्रुटी कमी करून ग्राहकांना सुधारित सेवा देण्यावर भर देते.अशी ही केंद्र सरकारची RDSS योजना आहे व तिचा हा मुख्य उद्देश असतांना आमच्या ग्रामीण आदिवासी बहुल भागात आजही अनेकदा विजेचा लपंडाव सातत्याने चालू असतो.योजना पूर्ण असून तिचा लाभ आमच्या ग्रामीण भागातील ग्राहकांना कधी मिळेल असा प्रश्न निर्माण झाला आहे.ग्रामीण भागात महिन्यातून 12 दिवस थ्री फेज लाईट चालू असते त्यातही तांत्रिक कामकाजासाठी दर सोमवारी किंवा पाहिजे त्यावेळी लाइन बंद घेतली जाते यामुळे आमच्या स्थानिक ग्राहकांची शेतकरी बांधवांची थ्री फेज लाईट वाचून मोठी गैरसोय होत आहे.तरी महोदय आपण हा गंभीर प्रश्न तात्काळ लक्ष्यात घेऊन गांभीर्याने दखल घेऊन सोडवावा व टाकेद गावठाण भागात Rdss थ्री फेज लाईन तात्काळ कार्यान्वित करण्यात यावी.साकुर सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या फिडर मध्ये गावठाण क्षेत्रात थ्री फेज लाईन चालू झाली असून परदेशवाडी सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्वच फिडर मध्ये केव्हा Rdss योजनेअंतर्गत कायमस्वरूपी थ्री फेज लाईट चालू होईल असा प्रश्न आमच्या टाकेद भागात निर्माण झाला आहे.तरी आपण हा विषय तात्काळ सोडवावा ही विनंती.
विनंती निवेदनातील विषय 2 नुसार परदेशवाडी सबस्टेशन याठिकाणी सध्या 5 MVA चे 2 ट्रान्सफॉर्मर आहेत या 5MVA च्या ट्रान्सफॉर्मरमुळे आमच्या टाकेद,खेड व बारशिगवे फिडर सह अन्य सर्वच फिडरला पाहिजे तसा विद्युत भार लोड मिळत नाही.व या कारणास्तव टाकेद भागात Continue थ्री फेज वीज मिळत नाही.या 5MVA 5 चे 10MVA , 10 चे praposer आपल्याकडे मंजूर असून 5 to 10 Aggumentation त्वरित करण्यात यावे. 5 ऐवजी तात्काळ 10MVA चे 2 ट्रान्सफॉर्मर परदेशवाडी सबस्टेशन याठिकाणी उपलब्ध करून देण्यात यावे.यामुळे आमच्या ग्रामीण भागातील थ्री फेज लाईट वाचून होणारी गैरसोय कायमची दूर होईल.व आमच्या टाकेद भागातील सर्व शेतकरी बांधवांना उद्योग व्यवसायिकांना कायमस्वरूपी थ्री फेज लाईट continue मिळेल.यासंह परदेशवाडी सबस्टेशन हे कायमस्वरूपी विभक्त section करून याठिकाणी कर्मचारी संख्या वाढविण्यात यावी व आमच्या टाकेद भागाचा कायमस्वरूपी single fase, three fase light supply विद्युत पुरवठा प्रश्न सोडवावा असे या निवेदनात सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनी म्हंटले आहे.
“केंद्र सरकारच्या वितरण क्षेत्र विकास(आर डी एस एस) या योजनेच्या माध्यमातून आमदार माणिकराव कोकाटे यांचे प्रयत्नातून परदेशवाडी सबस्टेशनअंतर्गत टाकेद गावठाण भागात २४ तास थ्री फेज विद्युत पुरवठा करण्यासाठी योजना राबविण्यात आली. आज सर्व कामकाज पूर्ण असून सुद्धा संबंधित योजनेचे कामकाज करणारे कंत्राटदार यांचे दुर्लक्षामुळे टाकेद परिसरात शेतकरी ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे.संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांनी तात्काळ हा प्रश्न न सोडविल्यास आमदार माणिकराव कोकाटे यांचेमार्फत विधानसभेत लक्ष्यवेधी केली जाईल.”
– राम शिंदे, सामाजिक कार्यकर्ते टाकेद बु.
“आर डी एस एस योजना राबविणाऱ्या कंत्राटदारांशी चर्चा झाली असून येत्या दहा दिवसांच्या आत सदर आर डी एस एस योजनेचे सर्व कामकाज पूर्ण करून गावठाण भागात २४ तास थ्री फेज वीज पुरवठा केला जाईल.अश्या सूचना देखील कंत्राटदारांना दिल्या आहेत.”
– आर जे थल, अधीक्षक अभियंता वीज वितरण डिव्हीजणल ऑफिस नाशिक.
“आर डी एस एस योजनेचे कामकाज पूर्ण झाले असून विद्युत पुरवठा करण्यासाठी परवानगी मिळताच आठवडाभरात टाकेद परिसरात नवीन विद्युत वाहिणीतून वीज पुरवठा करण्यात येईल.प्रथमतः टाकेद फिडर चालू करून टाकेद गावाला चोवीस तास थ्री फेज विद्युत पुरवठा सुरू करण्यात येईल अशा सूचना देखील संबंधित ठेकेदारांना वरिष्ठांकडून देण्यात आल्या आहे.”
– निखिल शेलार, कनिष्ठ अभियंता वीज वितरण घोटी ग्रामीण
फोटो : नाशिक डिव्हिजनल ऑफिसमध्ये अधीक्षक अभियंता आर जे थल,ग्रामीण कार्यकारी अभियंता झटकर यांना टाकेद येथील वीज प्रश्नासंदर्भात निवेदन देतांना सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, जेष्ठ नागरीक आबाजी बारे,दत्ता गायकवाड, बाळू मुकणे आदींसह शिष्टमंडळ.