जळगावहून नवी दिल्लीसाठी विशेष रेल्वेगाडी; केव्हा सुटणार?
जळगाव : सणासुदीच्या काळात तसेच प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पाहिली खेप यशस्वी ठरल्यानंतर जळगाव ते पानिपतदरम्यान सोमवारी आणखी एक विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जळगाव, भुसावळ आणि मार्गावरील अन्य स्थानकांवरून उत्तर भारताकडे पर्यायाने नवी दिल्लीकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त रेल्वे सेवेचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

गाडी क्रमांक ०१०६७ ही विशेष रेल्वेगाडी सोमवारी, २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता जळगाव स्थानकातून रवाना होणार असून, दुसऱ्या दिवशी मंगळवारी सायंकाळी ६ वाजता पानिपत येथे पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०१०६८ ही विशेष रेल्वेगाडी मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता पानिपत येथून सुटेल. ही गाडी बुधवारी, २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता जळगाव स्थानकावर पोहोचणार आहे. दोन्ही दिशांनी विशेष गाडी चालविण्यात येणार असल्याने प्रवाशांना नियोजित प्रवासासाठी पर्यायी रेल्वेसेवा उपलब्ध होणार आहे.


रेल्वे प्रवासासाठी वाढणारी मागणी आणि गाड्यांमधील गर्दी लक्षात घेऊन विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येतात. जळगाव–पानिपत विशेष गाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रातून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमार्गे दिल्ली परिसर आणि हरियाणाकडे जाणाऱ्या प्रवाशांना प्रवासाचे नियोजन करता येणार आहे. जळगाव जिल्ह्यासह भुसावळ परिसरातील प्रवाशांसाठीही ही गाडी महत्त्वाची ठरणार आहे.
या विशेष रेल्वेगाडीला मार्गावरील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यामध्ये भुसावळ, खंडवा, भोपाळ, बिना, आग्रा कॅन्टोन्मेंट, नवी दिल्ली आणि पानिपत या स्थानकांचा समावेश आहे. त्यामुळे या स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही या विशेष सेवेचा लाभ घेता येईल. जळगावहून सुटल्यानंतर ही गाडी भुसावळमार्गे पुढील प्रवास करेल. मध्य प्रदेशातील खंडवा आणि भोपाळ तसेच बिना स्थानकांवर थांबल्यानंतर आग्रा कॅन्टोन्मेंट आणि नवी दिल्लीमार्गे पानिपत येथे पोहोचेल. मात्र, प्रत्येक स्थानकावरील आगमन आणि प्रस्थानाच्या अचूक वेळांसाठी रेल्वेच्या अधिकृत वेळापत्रकाची पडताळणी करणे आवश्यक आहे.