नाशिक फिल्म फेस्टिवल डायरेक्टर मुकेश कनेरी ह्यांचे वडील स्वर्गीय (डॅडी) प्रथम पुण्यस्मरण शोकाकुल वातावरणात संपन्न 

0

नाशिक चित्रपट महोत्सवाचे दिग्दर्शक, सर्वेसर्वा आदरणीय मुकेश जी कनेरी यांचे वडील स्वर्गीय गंगाधर अनंत कनेरी उर्फ डॅडी यांचे प्रथम पुण्यस्मरण कुसुमाग्रज स्मारक नाशिक येथे शोकाकुल भावभिनी वातावरणात तिथी नुसार पार पडले. या कार्यक्रमात प्रित्यर्थ अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. त्यात समाजसेवक राजकारणी आणि चित्रपट महामंडळाचे दिग्गज तथा कनेरी साहेबांच्या मित्रांनी व आप्तेष्टांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शवली. रेवा मीडिया इंटरटेनमेंटच्या माध्यमातून कै. डॅडींचे विचार व त्यांची जीवन सरणी श्रद्धांजली रूपाने वक्त्यानी जनतेसमोर आणली. जगत असताना मरायचं,
कि मेल्यानंतर ही जगायचं.

निंदा करणाऱ्यांची गर्दी झाली तरीही आपण मात्र प्रेमानेच वागायचं. हा विचार स्वर्गीय डॅडींचा प्रियदर्शनी मुकेश कनेरी आणि प्रभावती गंगाधर कनेरी तसेच कणेरी परिवारा मार्फत संदेश रुपाने श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. त्यात प्रामुख्याने रेवा तिशा गौरांग आणि समस्त कनेरी फॅमिली व त्यांचे अप्तेष्टमंडळींनी आदरांजली अर्पण केली. डॅडींचे सुपुत्र हे सन्माननीय मुकेश जी कनेरी त्यांचाच प्रेमाचा वारसा हक्क चालवत असून सतत चित्रपट महोत्सवाच्या निमित्तातून कलावंतांना आपलंसं करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यात एकेकाळ चे हिंदी सिनेसृष्टीचे बेताज शहेनशहा राजेश खन्ना पासून तर क्रांतीचे लीजेंडरी ऍक्टर मनोज कुमार पर्यंत दिल्या गेलेले नाशिक आंतरराष्ट्रीय फिल्म पुरस्कार डोळ्यांमध्ये मुकेश कनेरी साहेबांचा अनमोल वाटा आहे. 2025 चा चित्रपट महोत्सव सोहळा मागील महिन्यात संपन्न झाला असून महाराष्ट्र राज्याच्या कलावंतांसहित नाशिकच्या कानाकोपऱ्यातून मुकेश जी कनेरी साहेबांच्या या महोत्सवाला रसिकांची रीघ लागली होती. मरण हे अटळ सत्य आहे

आणि ते आज डॅडींचे झाले एका दिवशी सगळ्यांना च येणार, परंतु माणसाने माणसाशी प्रेमाने वागलं पाहिजे अन्यथा दुसरे धरतीवर काहीच नाही ही स्वर्गीय डॅडींची शिकवण आहे, या शब्दात मराठी चित्रपट माया ममता चे दिग्दर्शक लेखक, गीतकार,आणि उत्तर महाराष्ट्र प्रवक्ता विशाल वाघ यांनी आपल्या संदेश सुमनांनी मुंबईहून श्रद्धांजली अर्पण केली.

Leave A Reply

Your email address will not be published.