पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते युवराज माळी यांचा गौरव

0

शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील पोलीस पाटील युवराज मोहन माळी यांना महाराष्ट्र शासनातर्फे राज्य पाटलांच्या वतीने देण्यात येणारा राज्यपाल शौर्य पुरस्कार मिळाल्याबद्दल त्याचा शिंदखेडा येथील बिजासनी मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला

भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी माळी हे नेहमी कार्यतत्पर पोलिस पाटील असुन ते नेहमी समाज कार्यात ते अग्रेसर असतात गावातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पारदर्शक काम करीत आहेत शासनातर्फे गोरगरीब जनतेला शासकीय योजनांची माहिती ते नेहमी जनजागृती करून सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतात यामुळे शासनाने दखल घेत अवघ्या सात वर्षात अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिदखेडा प स माजी सभापती रंणजीत गिरासे प स सदस्य प्रवीण माळी धुळे जिल्हा भाजपा चिटणीस प्रवीण माळी व व्हॉइस ऑफ मीडियाचे संजय कुमार महाजन माजी नगरसेवक उल्हास देशमुख पत्रकार भूषण मराठे प्राध्यापक निरंजन वेदे अँड विनोद पाटील दोंडाईचा बाजार समिती संचालक रोशन टाटिया धनराज निकम आदी मान्यवर उपस्थित होते युवराज माळी यांना शासनाच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी बाबत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.