अकरावीच्या प्रवेशाच्या नियमांमध्ये बदल ; पालक वर्गात प्रचंड नाराजीचे वातावरण
मुंबई । 11 वीच्या अॅडमिशनसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून याच दरम्यान, अकरावीच्या प्रवेशाच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे.11 वीचे ऑनलाइन प्रवेश देताना शासनाने यावेळी इनहाऊस 10 कोट्याचे नियम बदलल्याने संबंधित पालक वर्गात प्रचंड नाराजीचे वातावरण आहे.
11 वीचे ऑनलाइन प्रवेश देताना शासनाने यावेळी इनहाऊस 10 कोट्याचे नियम बदलल्याने संबंधित पालक वर्गात प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. पालकांनी रितसर माहिती देऊन घेऊन या निर्णयला विरोध दर्शवलाय. या पूर्वी फर्ग्युसन सारख्या नामाकिंत कॉलेजमधे या कॉलेजची मूळ संस्था डीईएस संचलित शाळांमधील मुलांना 10 जागा कोटा राखीव असायचा. आता या नियमांत बदल करण्यात आला आहे.
यावेळी शासनाने फर्ग्युसन कॉलेजच्या नियमांत बदल करून फक्त त्या कॉलेजच्या कँम्पसमधील शाळांमधील विद्यार्थी यांना 10 टक्के कोटा उपलब्ध असेल. त्याच संस्थेमार्फत इतरत्र चालवल्या जाणाऱ्या शाळांमधील मुलांना या 10 टक्के कोट्यातून यापुढे प्रवेश मिळणार नाहीत. त्यामुळे आता संस्थेच्या इतर शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी कोट्यअंतर्गत प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये अॅडमिशन घ्यायचे आहे ते मात्र निराश झाले आहेत.
यामुळे नामांकित कॉलेजेसच्या शाळांमधील विद्यार्थी – पालक वर्गाची मोठी अडचण झालीये. म्हणून त्यांनी शिक्षण मंञ्यांना भेटून हा जीआर रद्द करण्याची मागणी केलीय. नियमांत बदल झाल्यामुळे पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.