इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथे डांगी जनावरांच्या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन
निवड झालेल्या पशुधनाचे बक्षीस वितरण संपन्न.
इगतपुरी :वासाळी ग्रामपंचायत हे राज्यातील आदर्श गाव म्हणून लवकरच लौकिक करणार असून अल्प उत्पन्न असताना इतका मोठा कार्यक्रम घेऊन राज्यात आदर्श निर्माण करणारी वासाळी ग्रामपंचायत ही खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे त्याच प्रमाणे या डांगी जनावरांच्या प्रदर्शनासाठी शासनाकडून निधी कसा प्राप्त होईल यासाठी प्रयत्न करू असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केले.
इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथे जय अंबिका यात्रौत्सवानिमित्ताने नाशिक जिल्हा परिषद पशुसंवर्धन व कृषी विभागामार्फत भरविण्यात आलेल्या डांगी व जातीवंत जनावरांच्या प्रदर्शनाचे व भव्य कृषी प्रदर्शनाचे उद्घाटनं खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते संपन्न झाले तर प्रदर्शनचे आयोजक तालुकाध्यक्ष काशिनाथ कोरडे, सरपंच सुनीता कोरडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभ हस्ते झाले.या उद्घाटन समारंभाला व बक्षीस वितरण करण्यासाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे प्रमुख म्हणून उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी आयुक्त चंद्रकांत खाडे,निवृत्ती जाधव, उदय जाधव, सुनील जाधव, दिलीप चौधरी, ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर पाटील, इगतपुरी व नाशिक जि.प.पशुसंवर्धन, पशुधन निवड समिती सहाय्यक आयुक्त उपसरपंच एकनाथ खादे व सर्व सदस्य तसेच टाकेद खेड गटातील सर्व ग्रामपंचायतचे सरपंच व जिल्हाभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित असलेल्या प्रमुख मान्यवरांचे स्वागत व सत्कार गावचे प्रथम नागरिक सरपंच सुनीता कोरडे व उपसरपंच एकनाथ खादे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनार्दन झडे झडे यांनी केले तर आभार प्रदर्शन राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष काशिनाथ कोरडे यांनी मानले.
प्रदर्शनाचा उद्देश :
इगतपुरी तालुक्यातील साधारण पंचेचाळीस गावांत तसेच नाशिक, पालघर, ठाणे जिल्ह्यांमधील काही तालुक्यांत आदीवासी शेतकरी आहेत. या भागात दरवर्षी जोरदार पाऊस पडतो या पावसात शेतीकामासाठी केवळ डांगी बैल उपयोगी ठरतात त्यामुळे येथील शेतकऱ्यांकडे डांगी बैलजोडी दिसते डांगी जनावरांचे जतन संवर्धन करण्यासाठी वासाळी येथील उपक्रमशिल सरपंच काशीनाथ कोरडे सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या संकल्पनेतून डांगी जनावरांचे प्रदर्शन वासाळी येथे या वर्षापासून सुरू केले .या प्रदर्शनात डांगीमधील काळा, बाळा, काळा, बाळा, ढवळा , लाल्या हे उपप्रकारदेखील पहावयास मिळाले. प्रदर्शनातूनच जातिवंत जनावरांची खरेदी – विक्रीही सुरू झाली .या पहिल्या प्रदर्शनात साधारण २५ ते ३० हजार जनावरे आली होती . त्यात टप्प्याटप्याने वाढ होत गेली यंदा जनावरांच्या खरेदी – विक्रीतूनं मोठी उलाढाल होत असते.
जनावरांची खरेदी विक्री :
उलाढाल लक्षावधी रुपये
प्रदर्शनातील यंदाची स्थिती •
सुमारे ३ लाख जनावरांचे यंदाचे दर • डांगी बैल – ४५ हजार ते १ लाख रुपये • डांगी गाय – १५ ते ३५ हजार रुपये • डांगी दुभती गाय – ३० ते ५० हजार रुपये •खिलार बैल – ५० हजार ते १ लाख • म्हैस – २० ते ६० हजार रुपये देशी बियाण्यांबाबत जागृती • प्रदर्शनात सहभागी झालेली डांगी जनावरे पाहण्यासाठी आणि यात्रोत्सवात सहभागी होण्यासाठी सर्वदूर भागातील आदिवासी तर येतातच ; पण अन्य लोकही येतात .इगतपुरी तालुक्यासह आदिवासी भागात बहुतांश कुटुंबांत विविध पिकांच्या देशी जातींचे संवर्धन केले जाते . या तालुक्यात बियाणे संवर्धनाचे प्रमाण अधिक आहे.
——
यांनी घेतले विशेष परिश्रम
बाळा कचरे, भरत कोरडे, सखुबाई कोरडे, अनुसया खादे, ताराबाई झोले, भरत जाधव, सुनंदा जाखेरे, मोनिका भालेरावं, सहकार्य लक्ष्मण धांडे, राजाराम खादे, तानाजी कोरडे, जयंत कोरडे, सीताआराम कचरे, रामचंद्र डहाळे, पाणी व्यवस्थापन प्रवीन मुठे आणि गावातील जमीन मालक
निवड झालेले पशुधन मालक यांचे विशेष परिश्रम लाभले.