भुसावळ खून प्रकरणातील 5 संशयित मनमाड येथून अटक

0

जळगाव : भुसावळ येथे शुक्रवारी (दि.10) सकाळी डीडी कोल्ड्रिंग्सच्या दुकानामध्ये गोळीबार करुन तेहरीम अहमद नासीर अहमद (३५, रा. जाम मोहल्ला, भुसावळ) या तरुणाचा खून झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी भुसावळ पोलिसांनी या खुनाचा छडा लावला आहे. पोलिसांनी जलदगती तपास करत या प्रकरणातील 5 संशयित आरोपींना अटकेत घेतले आहे. तसेच त्यांच्याकडून 4 पिस्तूल अन् 3 काडतूस जप्त करण्यात आली आहे. त्याच्यावर भुसावळ पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूर्ववैमनस्यातून कट रचून हा खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या खून प्रकरणात गोळीबार करणारे अदनान शेख युनूस (२९), शेख साहिल शेख रशीद (२१) दोन्ही रा. आगाखान वाडा, भुसावळ, अब्दुल नबी हनीफ पटेल (३१, रा. मास्टर कॉलनी, जळगाव) व सनीस नाईन मोहम्मद आसिफ (१९, रा. एमआयडीसी एरिया, जळगाव) या चार जणांना मनमाड येथून अटक केली.

त्यांच्याकडून चार गावठी पिस्तूल, तीन जिवंत काडतूस, एक पुंगळी जप्त केली आहे. सलमान पटेल याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. इतर चार जणांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.