भुसावळ- बडनेरा खंडात 10 डिसेंबर रोजी शाडो ब्लॉकअंतर्गत विविध कामे पूर्ण
भुसावळ विभागातील भुसावळ- बडनेरा खंडात शाडो ब्लॉकच्या कालावधीत एकाच दिवशी अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा कामे यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. ही कामे रेल्वेच्या सुरक्षिततेसह संरचना मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. या कामांचा संक्षिप्त आढावा पुढीलप्रमाणे आहे:
1. बिस्वा ब्रिज रेल्वे स्थानक: नवीन पादचारी पुलासाठी गर्डर लाँचिंगचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यात आले. 25 मेट्रिक टन वजनाचे तीन गर्डर रेल्वे क्रेनच्या साहाय्याने यशस्वीरीत्या लाँच करण्यात आले.
2. गायगाव-पारस खंड: किमी 569/2 येथे मर्यादित उंचीचा भूमिगत मार्गासाठी गर्डर बसवण्याचे काम नियोजित वेळेत पूर्ण झाले. 10 मीटर उंचीचा गर्डर आरसीसी बॉक्ससह स्थापित करण्यात आला.
3. अकोला-गायगाव खंड: किमी 578/19-23 (अप लाईन) आणि किमी 578/2 येथे स्टील गर्डरचे पीएससी स्लॅब (10.28 मीटर लांबीचे) मध्ये बदल करण्यात आले.
4. भुसावळ सी केबिन-वरंगाव: डाउन रेल्वे मार्गावर किमी 451/31-452/02 आणि 452/14-16 येथे एटी वेल्डिंगचे काम नियोजित वेळेपूर्वी पूर्ण करण्यात आले.
5. बोदवड यार्ड: संयुक्त स्विच विस्तार टंग रेल बदली आणि वेल्डिंगचे काम किमी 474/41-475/03 याठिकाणी वेळेपूर्वी पूर्ण झाले.
6. जलंब यार्ड (अप लाईन): किमी 533/13-15 येथे रेल बदली आणि वेल्डिंगचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यात आले.
7. नादुरा यार्ड (डाउन मार्ग): 60 किलो वजनाच्या रेल बदली आणि दोन ठिकाणी एटी वेल्डिंगचे काम वेळेपूर्वी पूर्ण झाले.
8. जलंब यार्ड (डाउन मार्ग): किमी 533/14-16 येथे रेल बदली आणि वेल्डिंगचे काम वेळेपूर्वी पूर्ण झाले.
9. काटेपुर्णा-बोरगाव (अप लाईन): किमी 603/07 आणि 608/27 येथे 10 बीओबीवाईएन वैगनमधून गिट्टीचे यशस्वी अनलोडिंग करण्यात आले.
सर्व कामे उच्च गुणवत्ता मानकांनुसार आणि नियोजित वेळेत पूर्ण करण्यात आली. या सुधारणा कामांमुळे प्रवासी सुरक्षितता, संरचनात्मक मजबुती आणि रेल्वे परिचालन कार्यक्षमता मोठ्या प्रमाणावर वाढेल.